शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकेवर कारवाई न केल्यास आंदोलन

By admin | Updated: December 22, 2014 22:44 IST

येथील तुकूम प्रभाग क्रमांक २ मधील भाजपाची नगरसेविका रत्नमाला सोपन वायकर यांनी आपल्याला मारहाण केली असून मागील काही दिवसांपासून त्यांचा हा प्रकार सुरु आहे. त्यामुळे वॉर्डातील

चंद्रपूर : येथील तुकूम प्रभाग क्रमांक २ मधील भाजपाची नगरसेविका रत्नमाला सोपन वायकर यांनी आपल्याला मारहाण केली असून मागील काही दिवसांपासून त्यांचा हा प्रकार सुरु आहे. त्यामुळे वॉर्डातील नागरिक त्रस्त झाले आहे. यासंदर्भात पोलिसात तसेच भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मारहाण करणाऱ्या नगरसेविकेला निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.येथील रमेश भलमे हे वॉर्डातील स्वच्छता करावी याबाबत नगरसेविका रत्नमाला वायकर यांना सांगण्यासाठी गेले असता. नगरसेविका तसेच त्यांचे पती सोपान वायकर यांनी भलमे यांना मारहाण केली. एवढेच नाही तर दोन वर्षापूर्वी एका वृद्ध महिलेने नगरसेविकेकडे पूर आल्यासंदर्भात नुकसान भरपाईबाबत विचारणा केली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली होती. यासंदर्भात त्या वृद्धेने पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी आपल्यावर दबाव आणून या प्रकरण थांबविण्याचे सांगितले असल्याचे बेबी रामटेके यांनी यावेळी सांगितले.नागरिकांना मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्या नगरसेविकेवर कारवाई करावी, अशी मागणी नामदेव धानोरकर यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल देशकर यांच्यासह वरिष्ठांकडे केली आहे. तसेच पोलिसातही तक्रार देण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला बेबी रामटेके, अशोक वाटेकर, अरविंद सातपूते, रमेश भलमे, सुधाकर शेंडे यांच्यासह वॉर्डातील नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)