शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी किती वर्ष बसस्थानकाची प्रतीक्षा?

By admin | Updated: December 21, 2014 22:57 IST

तालुक्यातील एकमेव मोठी बाजारपेठ व नगरपरिषदेचा दर्जा प्राप्त असलेल्या गडचांदूर शहरात अद्यापही बसस्थानक नाही. त्यामुळे प्रवाशांनी थांबायचे कुठे, असा प्रश्न पडतो. शेकडो विद्यार्थी व प्रवासी बसची

आशिष देरकर - गडचांदूरतालुक्यातील एकमेव मोठी बाजारपेठ व नगरपरिषदेचा दर्जा प्राप्त असलेल्या गडचांदूर शहरात अद्यापही बसस्थानक नाही. त्यामुळे प्रवाशांनी थांबायचे कुठे, असा प्रश्न पडतो. शेकडो विद्यार्थी व प्रवासी बसची वाट बघत रस्त्यावर ताटकळत उभे राहतात. मागील दोन दशकांपासून असलेली बसस्थानकाची मागणी अजुनपर्यंत पूर्ण झाली नाही. त्यामुळे आणखी बसस्थानकासाठी किती दिवस प्रतीक्षा करायची, असा प्रश्न येथील नागरिक तथा प्रवाशी करीत आहे. शहराला नगरपालिकेचा दर्जा प्राप्त झाल्याने आतातरी बसस्थान होईल, अशी आशा येथील नागरिक बाळगून आहे.गडचांदूर शहर कोरपना तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. माणिकगड, अल्ट्राटेक, अंबुजा व मुरली अ‍ॅग्रो या चारही सिमेंट कंपन्या गडचांदूरच्या अवती-भोवती आहे. त्यामुळे गडचांदूरला विशेष महत्त्व आहे. कोरपना व जिवती या दोन्ही तालुक्यातील ग्राहकांना कोणत्याही वस्तूंच्या खरेदीकरिता गडचांदूरला आल्याशिवाय पर्याय नाही. गडचांदुरात ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बसस्थानकावरील गर्दीवरून या शहराचे महत्व कळते.कोरपना व जिवती तालुक्यातील हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. ग्राहकांचा, विद्यार्थ्यांचा व प्रवाशांचा संबंध बसस्थानकाशी येतो. मात्र येथील २५ बाय ८ क्षेत्रफळाच्या बसस्थानकात या सर्वांनी आसरा घ्यायचा कसा, असा प्रश्न पडतो. त्यातल्या त्यात आधीच लहान क्षेत्रफळ असलेल्या या बसस्थानकात राजुरा आगाराचे छोटे कार्यालयसुद्धा सुरू करण्यात आल्याने जागा आणखी कमी झाली आहे.गडचांदूर येथे महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, शरद पवार कला महाविद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, लाल बहादूर शास्त्री विद्यालय, शरदचंद्र पवार कनिष्ठ महाविद्यालय, दोन अध्यापक विद्यालये, बी.एड. महाविद्यालय व इंग्रजी माध्यमाच्या विविध शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गडचांदुरात शिक्षण घेण्याकरिता आल्याशिवाय पर्याय नाही. शहराच्या वाढत्या महत्वानुसार येथे कित्येक वर्षापूर्वीच मोठे बसस्थानक होणे आवश्यक होते. मात्र लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे ते होऊ शकले नाही. परिणामी प्रवाशांना मागील अनेक वर्षांपासून त्रास सहन करीत बसची वाट बघावी लागते. आता नगर परिषदेचा दर्जा मिळाल्याने बसस्थानक होतील, अशी अपेक्षा आहे.