वेडसर मुलीने लावली घराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:55 IST2020-12-04T04:55:31+5:302020-12-04T04:55:31+5:30

मूल : वेडसर मुलीने आपल्याच घराला आग लावल्याने संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. मूल नगर परिषदेची अग्नीशामक पथक घर ...

The house was set on fire by a cracked girl | वेडसर मुलीने लावली घराला आग

वेडसर मुलीने लावली घराला आग

मूल : वेडसर मुलीने आपल्याच घराला आग लावल्याने संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. मूल नगर परिषदेची अग्नीशामक पथक घर राहिल्याची घटना राहिले. ही घटना बुधवारी चिंचाळा येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार चिंचाळा येथील रहिवासी दिलीप कोमरेल्लीवर पदवीधर असलेली मुलगी काही वर्षांपासून मानसिक तणावात आहे. आई-वडील हे कपडे टेलरिंगचा व्यवसाय करतात. हे कुटुंब भूमिहीन असून उत्पन्नाचे कुठलेही साधन नाही. कोमरेलीवार यांना तीन मुली आहेत. मोठ्या मुलीचे लग्न झाले तर मधली मुलगी वेडसर आहे. तिचे मानसिक संतुलंन बिघडले. यातून मुलीने आज आपल्याच घरी आग लावली. कौलारू घर असल्याने त्यातील लाकूडा फाटा काही प्रमाणात जळाला. मात्र, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. मूल नगर परिषदेचे अग्निशामक पथक लगेच चिंचाळा येथे पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.

Web Title: The house was set on fire by a cracked girl