होम क्वारंटाईन व्यक्ती फिरत आहेत रस्त्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:00 AM2020-03-30T06:00:00+5:302020-03-30T06:00:51+5:30

कोरोना व्हायरसने सर्वत्र पाय पसरले आहे. देश तथा राज्य या आजाराने ग्रस्त असल्याने सर्वांना धडकी भरली आहे. बाहेर राज्यात व इतर जिल्ह्यात नोकरीकरिता व शिक्षणाकरिता गेलेले युवक स्वगृही परतले. परंतु येथे येताच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आणि त्यांना होम कारेंटाईन करण्यात आले. त्यांच्या हातावर शिक्का मारून पुढील १४ दिवस घरीच राहण्याचा सल्ला दिला.

Home quarantine people are walking the streets | होम क्वारंटाईन व्यक्ती फिरत आहेत रस्त्यांवर

होम क्वारंटाईन व्यक्ती फिरत आहेत रस्त्यांवर

Next
ठळक मुद्देहोम क्वारंटाईन व्यक्ती फिरत आहेत रस्त्यांवर

लोकमत न्यूज नेटवर्क
आवाळपूर : देशभरात कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्याच धर्तीवर संपूर्ण भारत देशात संचारबंदी लाग आहे. परराज्यातून, इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीस घरी राहण्याकरिता होम कारेंटाईन करून त्यांच्या हातावर शिक्का मारण्यात आला आहे. त्यांना पुढील १४ दिवस घरी राहण्याची सक्त आदेश दिले आहेत. मात्र आवाळपूर, नांदाफाटा येथील असे व्यक्ती सर्रास रस्त्यावर व इतरत्र फिरताना दिसत आहेत.
कोरोना व्हायरसने सर्वत्र पाय पसरले आहे. देश तथा राज्य या आजाराने ग्रस्त असल्याने सर्वांना धडकी भरली आहे. बाहेर राज्यात व इतर जिल्ह्यात नोकरीकरिता व शिक्षणाकरिता गेलेले युवक स्वगृही परतले.
परंतु येथे येताच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आणि त्यांना होम कारेंटाईन करण्यात आले. त्यांच्या हातावर शिक्का मारून पुढील १४ दिवस घरीच राहण्याचा सल्ला दिला.
परंतु ही तरुण मंडळी कसलीही भीती न बाळगता सर्रासपणे समाजात वावरत आहेत. एवढेच नाही तर त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता ते हुज्जत घालत असल्याचे समोर येत आहे.
आवाळपुरात ४० तर नांदाफाटा येथे १०५ युवक बाहेर जिल्ह्यातून व राज्यातून आलेले आहेत, हे विशेष. आपल्या घरी न राहता कुठेही दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आहे.

होम कारेंटाईन असलेल्या व्यक्तींनी शासनाचा आदेशाचे पालन करून घरीच राहावे. काही व्यक्ती रस्त्यावर फिरताना दिसून येत आहे. आम्हाला कडक पावले उचलून सक्ती करण्यास भाग पाडू देऊ नका.
-ग्रामविकास अधिकारी
गेडाम, ग्रामपंचायत नांदा

Web Title: Home quarantine people are walking the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.