शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकावरील हिरकणी कक्ष बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 05:00 IST

 सुरुवातीला जिल्ह्यातील आगारात हा कक्ष चांगल्या प्रकारे सुरू होता. स्तनदा माताही याचा लाभ घेत होत्या.  बसण्यासाठी योग्य जागा, फॅन, खिडक्यांना पडदे आदी सुविधाही पुरविण्यात आल्या होत्या. मात्र, आता यातील काहीच शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, सुविधाच नसल्याने स्तनदा माता या केंद्राकडे जातसुद्धा नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजनजागृतीचा अभाव : महिलांना कक्षाची माहितीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : स्तनदा मातांना प्रवासादरम्यान बाळाला स्तनपान करता यावे यासाठी प्रत्येक बसस्थानकावर  हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यातील अर्ध्याअधिक बसस्थानकावर हा कक्ष नाही.  ज्या ठिकाणी आहे, तिथे अत्यंत्य दुरवस्था झाली आहे.  त्यामुळे स्तनदा मातांना उघड्यावरच स्तनपान करावे लागत आहे.  विशेष म्हणजे, पहिला स्तनपान कक्ष स्थापन करण्याचा मान चंद्रपूर आगाराला आहे. त्यानंतर राज्यातील इतर आगारात हा कक्ष स्थापन करण्यात आला. मात्र, ज्या उद्देशासाठी हा कक्ष स्थापन करण्यात आला त्याला तिलांजली दिली जात आहे.        सुरुवातीला जिल्ह्यातील आगारात हा कक्ष चांगल्या प्रकारे सुरू होता. स्तनदा माताही याचा लाभ घेत होत्या.  बसण्यासाठी योग्य जागा, फॅन, खिडक्यांना पडदे आदी सुविधाही पुरविण्यात आल्या होत्या. मात्र, आता यातील काहीच शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, सुविधाच नसल्याने स्तनदा माता या केंद्राकडे जातसुद्धा नसल्याचे चित्र आहे.चंद्रपूरनंतर राज्य सरकारने प्रत्येक आगारात कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रत्येक आगारात कक्ष स्थापन करण्यात आला. या कक्षाच्या स्थापनेनंतर महिलांनी याचे स्वागतही केली. मात्र, आता आगारातील हा कक्ष दुर्लक्षित झाला आहे. चंद्रपूर आगारात सद्य:स्थितीत नावालाच हा कक्ष शिल्लक आहे. या कक्षामध्ये साधे नामफलकसुद्धा नाही. त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांना हिरकणी कक्षाची माहितीसुद्धा नाही. विशेष म्हणजे, आगारातील अनेक कर्मचाऱ्यांनाही या कक्षाबद्दल साधी माहिती नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

जागा मिळेल तिथेच स्तनपानचंद्रपूर येथे नव्याने बसस्थानक बांधण्यात येत आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात बसस्थानक उभारण्यात आले आहे.  या बसस्थानकामध्ये एका छोट्याच्या खोलीत हा कक्ष आहे. मात्र, कक्षासंदर्भात कुठेच माहिती नाही. साधा नामफलकसुद्धा लावण्यात आला नाही. त्यामुळे स्तनदा महिला हा कक्ष शोधण्याच्या भानगडीत न पडता जिथे जागा मिळेल तिथेच त्यांना स्तनपान करावे लागत आहे.

राज्यात चंद्रपुरात पहिली संकल्पनाबाळाला नि:संकोचपणे स्तनपान करता यावे, त्यांच्यावर अन्याय होऊ नये, ते सुदृढ व्हावे यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील टेमुर्डा येथील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डाॅ. किशोर भट्टाचार्य यांनी ही संकल्पना अस्तित्वात आणली. त्यानंतर चंद्रपूर आगारात पहिले हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले. याचा लाभही अनेक स्तनदा मातांनी घेतला. 

बाळाला आत्मसन्मानाने स्तनपान करता यावे यासाठी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली होती. मात्र, बाळांना न्याय मिळत नसून येणाऱ्या पिढीच्या सुदृढतेकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक माता आजही प्रवासादरम्यान स्तनपान करीत नसल्याची स्थिती आहे. यासाठी समाजामध्ये जनजागृती होणे गरजेचे असून  आगार प्रशासन, समाजानेही या कक्षाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.-डाॅ. किशोर भट्टाचार्यवैद्यकीय अधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :state transportएसटी