श्रावणात हिरवळीने नटला डोंगर परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 05:00 AM2020-08-01T05:00:00+5:302020-08-01T05:00:19+5:30

यावर्षी दमदार आणि अगदी वेळेवर पाऊस कोसळल्यामुळे संपूर्ण माणिकगड पहाड, जिवती तालुक्यातील छोटे-मोठे सर्व डोंगर हिरवागार दिसत आहे. श्रावण महिना सुरू झाला की, सणांची चाहुल लागते. गुरुपोर्णिमेपासून सुरू झालेले सण पुढे दिवाळीपर्यंत सुरू असतात. श्रावणात तर सणांची विशेष रेलचेल असते. त्यामुळे श्रावणाला सणांचा महिना म्हणूनही संबोधले जाते.

Hill area covered with greenery in Shravan | श्रावणात हिरवळीने नटला डोंगर परिसर

श्रावणात हिरवळीने नटला डोंगर परिसर

googlenewsNext
ठळक मुद्देजिवती, कोरपना परिसर निसर्गाने नटला : पहाड ठरतेय आकर्षणाचे केंद्रबिंदू

लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती/कोरपना : श्रावणामध्ये पहाडावरील जिवती तसेच माणिकगढ परिसरात निसर्गरम्य वातावरण तयार झाले आहे. निसर्गाने हिरवा शालू पांघरला आहे. संपूर्ण परिसर हिरवागार दिसत आहे. त्यामुळे सध्यास्थितीत परिसर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे या पर्यटनस्थळांकडे नागरिकांनी पाठ फिरविली आहे.
यावर्षी दमदार आणि अगदी वेळेवर पाऊस कोसळल्यामुळे संपूर्ण माणिकगड पहाड, जिवती तालुक्यातील छोटे-मोठे सर्व डोंगर हिरवागार दिसत आहे. श्रावण महिना सुरू झाला की, सणांची चाहुल लागते. गुरुपोर्णिमेपासून सुरू झालेले सण पुढे दिवाळीपर्यंत सुरू असतात. श्रावणात तर सणांची विशेष रेलचेल असते. त्यामुळे श्रावणाला सणांचा महिना म्हणूनही संबोधले जाते.
हिरवळीने नटलेला आसमंत आणि सणासुदीचा उत्साह सगळीकडे जाणवू लागला आहे. व्रत वैकल्याची धामधूम श्रावणात असते. घरोघरी धार्मिक अनुष्ठान सुरू असतात. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे सण उत्सवावर निर्बंध आले आहे.
उन्ह-पावसाचा लपंडाव रानातील मखमली फुलांची गर्दी, ढगांचे रंग आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. घाटामध्ये सध्या हिरवळ पसरली आहे. या घाटात आकाशात काळे ढग आणि खाली हिरवळ पाहण्याचा वेगळाच आनंद देऊन जात आहे. त्यामुळे निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोरपना, जिवती तालुका सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
 
Web Title: Hill area covered with greenery in Shravan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल