शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘इस्पात’च्या कामगारांची वीरुगिरी

By admin | Updated: June 11, 2015 01:29 IST

गेल्या अनेक महिन्यापासून कामगार कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्या इस्पात कंपनी व्यवस्थापनाशी प्रशासनाच्या मध्यस्थीने तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत होते.

मागण्या प्रलंबित : व्यवस्थापन दखल घेईनावरोरा : गेल्या अनेक महिन्यापासून कामगार कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्या इस्पात कंपनी व्यवस्थापनाशी प्रशासनाच्या मध्यस्थीने तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु यावर मार्ग निघू न शकल्याने अखेर कामगारांनी बुधवारी सकाळी ८.३० वाजता वरोरा तहसील परिसरातीलच टॉवर गाठून मनसेचे शहर अध्यक्ष मनिष जेठानी यांच्या समवेत टॉवरवर चढून तब्बल पाच तास वीरुगिरी केली.तालुक्यातील बीएस इस्पात कंपनीतील कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या त्वरीत सोडविण्यात याव्या याकरिता मनसेचे वरोरा शहर अध्यक्ष मनीष जेठाणी यांच्या नेतृत्वात गेल्या अनेक दिवसांपासून कामगारांचे कामबंद आंदोलन सुरु आहे. यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ४ जूनला कामगारांनी प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले होते. या भेटीदरम्यान पालकमंत्र्यांनी कंपनीच्या व्यवस्थापकाला मोबाईलद्वारे समस्या सोडविण्याचे आदेश दिले होते. तसेच ८ जूनला दुपारी ३ वाजता चंद्रपूर येथे कामगार आयुक्त समक्ष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या बैठकीला कंपनीच्या व्यवस्थापन मंडळातील अधिकाऱ्यांनी अनुपस्थिती दाखविली. त्यामुळे वारंवार होणाऱ्या अवहेलनेबाबत संतप्त कामगारांनी वरोरा तहसील कार्यालय परिसरातील लोखंडी टॉवरवर चढून तब्बल चार तास वीरुगिरी केली. या दरम्यान वरोरा उपविभागीय अधिकारी ठाणेदार इंगळे यांनी कंपनी व्यवस्थापन व मनसे पदाधिकारी मनदीप रोडे, गांजरे यांच्याशी चर्चा करुन भोलानाथ चिकनकर, विकास किन्नाके, स्वप्नील मिलमिले यांना टॉवरवरुन खाली उतरविण्यात यश मिळविले.या चर्चेत उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढे, ठाणेदार मलिकार्जुन इंगळे, मनविसे अध्यक्ष मनदीप रोठे, गांजरे, राजू बन्सोड, चेतन ढेंगळे, जयंत माशेरकर, महेश ठक, रिजवान रजा, विवेक बोकानी, निवृत्ती कांबळे आदी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)