आगीने होरपळलेल्या घराला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:28 IST2021-04-22T04:28:50+5:302021-04-22T04:28:50+5:30

गडचांदूर : गडचांदूर येथील प्रभाग क्र. १ मध्ये रात्री १ वाजताच्या सुमारास देवराव कल्लूरवार यांच्या घराला अचानक ...

Help a house on fire | आगीने होरपळलेल्या घराला मदत

आगीने होरपळलेल्या घराला मदत

गडचांदूर : गडचांदूर येथील प्रभाग क्र. १ मध्ये रात्री १ वाजताच्या सुमारास देवराव कल्लूरवार यांच्या घराला अचानक आग लागली. त्या आगीत सिलिंडरचा स्फोट होऊन घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. याची माहिती मिळताच महसूल विभागाकडून कल्लूरवार कुटुंबीयांना मदत देण्यात आली.

सिलिंडरचा स्फोट होताच राजू कल्लूरवार यांच्यासह धनराज चांदेकर, सुमित्राबाई मोरे यांचा घरांनाही आग लागली. नागरिकांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक वाहन येऊन ती आग संपूर्ण विझवण्यात आली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत घरात असलेले संपूर्ण सामान, अन्नधान्य जळून खाक झाले. त्या कुटुंबाला तहसीलदार महेंद्र वकलेकर यांच्या आदेशानुसार पटवारी सोहेल अन्सारी, अनिल एलमुलवार यांनी तत्काळ मदत करून त्यांची राहण्याची व्यवस्था केली.

Web Title: Help a house on fire