यावेळी नवीन आलेले ठाणेदार चंद्रशेखर बहादूरे उपस्थित होते. सेवानिवृत्तीसाठी केवळ पाच महिने व वर्ष व्हायला दोन दिवस बाकी असताना, ठाणेकरांची तातडीने बदली झाल्याने येथे शंका उपस्थित होत होत्या. मात्र, ही बदली प्रशासकीय बाब असल्याचे खुद्द नरेंद्र कोसुरकर यांनी सांगितले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}राजुरा पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगली साथ व या परिसरातील जनतेचे सहकार्य मिळाल्याने आपण येथे काम करू शकलो. त्यामुळे भविष्यात आपले प्रेम विसरता येणे शक्य नसल्याचे भावोद्गगार त्यांनी व्यक्त केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नरेंद्र कोसुरकर राजुरात असताना गुन्हेगारीवर वचक ठेवला. त्यासोबतच त्यांनी आपल्या साध्या सरळ स्वभावाने अनेकांना भुरळ घातली.