शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

पहाडावरील गावात होणार नागरिकांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:01 IST

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यालगत तेलंगणा राज्याची सिमा आहे. सिमेवर नाकाबंदी करण्यासाठी पोलिस बळ अपुरे असल्याने बंदोबस्तात असलेल्या पोलिसांवर याचा ताण पडत आहे. हा ताण कमी करण्यासाठी तहसिलदारांनी जिल्हा परिषद शाळेतील १०५ शिक्षकांना पोलिस मित्र बनवून कोरोनाची खबरदारी म्हणून त्यांना सिमेवर तैणात केले आहे.

ठळक मुद्देतपासणीसाठी सात पथक : डॉक्टर आपल्या दारी उपक्रम

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश व राज्य पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून अतिदूर्गम असलेल्या जिवती तालुक्यातील नागरिकांची गावागावात जावून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी जिवतीचे तहसिलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. ही आरोग्य तपासणी तालुक्यातील ११० गावात केली जाणार असुन यासाठी सात आरोग्य पथक गठित करण्यात आले आहे. या पथकात अनुभवी डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यालगत तेलंगणा राज्याची सिमा आहे. सिमेवर नाकाबंदी करण्यासाठी पोलिस बळ अपुरे असल्याने बंदोबस्तात असलेल्या पोलिसांवर याचा ताण पडत आहे. हा ताण कमी करण्यासाठी तहसिलदारांनी जिल्हा परिषद शाळेतील १०५ शिक्षकांना पोलिस मित्र बनवून कोरोनाची खबरदारी म्हणून त्यांना सिमेवर तैणात केले आहे.पहाडावर सर्दी, खोकला, ताप व अंगदुखीसारखे आजार नित्याचेच आहेत. मात्र सध्या कोरोनाची दहशत वाढल्यामुळे नागरिक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी करीत आहेत. ही बाब तहसिलदारांच्या लक्षात येताच ्यांनी ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. जिवती तालुक्यातील ११० गावात ही आरोग्य तपासणी केली जाणार आहे. गावातच अनुभवी डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून नागरिकांवर उपचार होणार असल्याने नागरिकांना ये-जा करण्याचा होणारा त्रास आणि आर्थिक भुर्दंडही वाचणार आहे.आरोग्य तपासणीसाठी नियुक्ती केलेल्या पथकात वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.पी.अनखाडे, डॉ. मिलिंद वानखेडे, डॉ. अंकुश गोतावळे, डॉ. राजेंद्र अहिरकर, डॉ. अर्चना तेलरांधे, डॉ. कविता शर्मा, डॉ.आबिद शेख तसेच आरोग्य कर्मचाºयांचा समावेश असुन ग्रामपंचायत निहाय त्या-त्या गावात जाऊन आरोग्य चमू नागरिकांची तपासणी करणार आहे.गेल्या काही दिवसांपासून पहाडावर विविध आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.यामुळे जिवती आणि पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. ही गर्दी टाळण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.- प्रशांत बेडसे पाटीलतहसिलदार, जिवती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य