शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

महत्प्रयासाने उगविलेले पीक रानडुकरांकडून फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 05:00 IST

वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या टेमुर्डा उपवनक्षेत्रातील कोटबाळ, गुजगव्हान शिवारातील संजय निब्रड, झित्रु बरडे, महेंद्र गारघाटे, रामकृष्ण ठोक, बंडू चवले, राजु आत्राम, वसंत पिजदूरकर, बंडू मिलमिले, किशोर जेवूरकर, कवडू निब्रड, वासुदेव डाखरे आदी शेतकºयांच्या शेती आहेत. यातील काही शेती जंगलाला लागून तर इतर जंगलापासून दूर आहे.

ठळक मुद्देअनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शेतकरी आधीच आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यात तारेवरची कसरत करीत शेतीची मशागत करून कापूस व सोयाबीन बियाण्यांची लागवड केली. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगविलेच नाही. काहींनी महत्प्रयासाने सोयाबीन उगविले. मात्र कपाशी व सोयाबीन बियाणे उगवताच वन्यप्राण्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केले. त्यामुळे अनेक शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या टेमुर्डा उपवनक्षेत्रातील कोटबाळ, गुजगव्हान शिवारातील संजय निब्रड, झित्रु बरडे, महेंद्र गारघाटे, रामकृष्ण ठोक, बंडू चवले, राजु आत्राम, वसंत पिजदूरकर, बंडू मिलमिले, किशोर जेवूरकर, कवडू निब्रड, वासुदेव डाखरे आदी शेतकºयांच्या शेती आहेत. यातील काही शेती जंगलाला लागून तर इतर जंगलापासून दूर आहे. या शेतकऱ्यांनी चालू हंगाम करीत शेतीची मशागत करून कापूस व सोयाबिनची पेरणी केली. सोयाबीन व कपाशीच्या बियाण्यांची उगवन झाली. त्यानंतर तुरळक प्रमाणात पाऊ स आल्याने दोन्ही पिके बऱ्यापैकी जमिनीवर आल्याने शेतकऱ्यांना हायसे वाटले. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच रोही, रानटी डुक्कर, हरीण यांच्या कळपाने सोयाबीन व कपाशीच्या पिकात धुमाकूळ घालत शेतातील सर्व सोयाबीन व कपाशीचे पीक उद्ध्वस्त करून टाकले. यातील काही शेतकºयांनी बियाणे कृषी केंद्रातून उधारीवर घेतले तर काहींनी उसनवारी रक्कम घेवून बियाणे विकत घेत पेरणी केली होती.आता शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता संपल्याने ऐन हंगामात शेत ओसाड राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने वन्यप्राण्यांच्या हैदोसाने नासाडी झालेल्या पिकांना आधी नुकसान भरपाई देण्याची मागणी वरोरा येथील वनविभागाच्या कार्यालयाकडे केली आहे.उगविलेले सोयाबीन व कपाशीचे पीक वन्यप्राण्यांनी उद्ध्वस्त केल्याच्या तक्रारी कार्यालयात आल्यानंतर पंचनामे करण्यात आले आहे. ते आता वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येणार आहे.- एम. पी. राठोड,वनपरिक्षेत्र अधिकारी, वरोरा

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती