कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातधुवा अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:01 IST2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:01:01+5:30

गोवरी येथेही तालुका प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत पान टपरी, खर्रा दुकाने, व्यावसायिकांना नोटीस देऊन दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्वांनी नियम पाळत दुकान बंद ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर गोवरी ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवारपासून हात धुवा अभियान राबविण्यात आले.

Handshake campaign against Corona's backdrop | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातधुवा अभियान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातधुवा अभियान

ठळक मुद्देगोवरी ग्रामपंचायतीचा उपक्रम : अनेक नागरिकांनी घेतला सहभाह

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : कोरोना व्हायरसची बाधा नागरिकांना होऊ नये यासाठी गोवरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पौर्णिमा उरकूडे यांच्या कल्पनेतून नागरिकांसाठी हात धुवा अभियान सुरू करण्यात आले आहे. कोरोना रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने गर्दीच्या ठिकाणी असलेल्या स्थळांवर बंदी घातली आहे. गोवरी येथेही तालुका प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत पान टपरी, खर्रा दुकाने, व्यावसायिकांना नोटीस देऊन दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्वांनी नियम पाळत दुकान बंद ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर गोवरी ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवारपासून हात धुवा अभियान राबविण्यात आले. यावेळी सरपंच पौर्णिमा उरकूडे, ग्राम विस्तार अधिकारी संजय तूरारे, अविनाश उरकूडे, सतीश पाचभाई, मारोती बावीस्कर, रमेश गाजुलवार, चेतन बोभाटे, प्रकाश काळे, भूषण जुनघरी, केतन बोभाटे, साईनाथ लांडे, अजय जुनघरी, अमय ठेंगणे, निलेश कोल्हे, आकाश गिरी, गोरघाटे, निखाडे, उपस्थित होते.

ृमराईपाटण येथील यात्रा बंद
जिवती : तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या मराई पाटण येथे गंगा मातेची यात्रा सुरू होती. याठिकाणी विविध राज्यातील व जिल्ह्यातील लाखोंच्या संख्येने भाविक मोठ्या श्रध्देने दर्शनासाठी येतात. मात्र यावळी कोरोनाच्या भितीमुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसिलदारांनी संबंधितांची बैठक घेऊन यात्रा बंद करण्याचे निर्देश दिले आहे.महिनाभर चालणारी यात्रा १६ मार्चला बंद करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिवतीचे तहसिलदार बेडसे पाटील यांनी ग्राम पंचायत, देवस्थान कमिटी, व्यापारी, तलाठी व उप पोलीस स्टेशन टेकामांडवाचे ठाणेदार यांच्या उपस्थिती बैठक घेऊन यात्रा बंद करण्यात संदर्भात माहिती दिली.जगभरात पसरलेला ‘कोरोना’ चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून तालुक्यातील मराईपाटण यात्रा रद्द करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

बल्लारपूर नगर परिषदेकडून प्रतिबंधात्मक उपाय
बल्लारपूर : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी बल्लारपूर नगर परिषदेने प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरु केली आहे. या अंतर्गत तक्रारी वा सूचना नागरिकांकडून मागविल्या जात आहे. नगर परिषदेतील त्या-त्या विभाग प्रमुखांच्या भ्रमणध्वनीवरुन नागरिकांनी सुचना घ्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. तद्वतच, कोरोना विषाणू संसर्गाला घाबरु नका, सावध राहा, काळजी घेऊ, करोनाला पळवून लावू, अशा घोषवाक्याअंतर्गत कोणकोणती दक्षता घेणे गरजेचे अांहे. याची माहिती नगर परिषदेकडून नागरिकांना देण्यात येत आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करीत ताप, खोकला वा पळसे असल्यास डॉक्टरांना लवकर दाखविण्याची विनंती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्पिता वावरकर यांनी केली आहे.

Web Title: Handshake campaign against Corona's backdrop