शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीच्या ठिकाणी जाताय मोबाईल सांभाळा; दररोज सरासरी चार तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 05:00 IST

स्मार्ट मोबाइल आता चैनीची वस्तू नाहीतर सर्वसामान्यांची गरज बनली आहे. संवादाचे प्रमुख माध्यम म्हणून मोबाईलकडे बघितले जाते. कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाल्याने तसेच अनेक खासगी कंपनीतील कामे ऑनलाईन सुरू झाल्याने लहान थोरापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांकडे स्मार्ट मोबाईल दिसून येतात. त्यामुळे मोबाईल चोरटे सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे हे चोरटे गर्दीचे ठिकाणी संधी शोधून मोबाईल पळवीतात.

ठळक मुद्देचोरीच्या तक्रारीत होतेय वाढ : पोलीस दफ्तरी गहाळ म्हणून नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्मार्ट मोबाईलचा वापर जसजसा वाढत आहे. अशातच मोबाईल चोरीच्या घटनाही वाढत आहेत. विशेष म्हणजे, गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल चोरी होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाताना मोबाईल सांभाडणे गरजेचे आहे. सन २०२० मध्ये १ हजार ३४७ मोबाईल गहाळ झाल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे.  साधारणतः दिवसातून चार मोबाईल चोरीला जात असल्याचे वास्तव आहे.स्मार्ट मोबाइल आता चैनीची वस्तू नाहीतर सर्वसामान्यांची गरज बनली आहे. संवादाचे प्रमुख माध्यम म्हणून मोबाईलकडे बघितले जाते. कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाल्याने तसेच अनेक खासगी कंपनीतील कामे ऑनलाईन सुरू झाल्याने लहान थोरापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांकडे स्मार्ट मोबाईल दिसून येतात. त्यामुळे मोबाईल चोरटे सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे हे चोरटे गर्दीचे ठिकाणी संधी शोधून मोबाईल पळवीतात. चंद्रपुरात तर जबरीने मोबाईल पळविण्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. सायबर पोलिसांकडे आलेल्या तक्रारीवरून सन २०१९ मध्ये दोन हजार ९७९ तर २०२० मध्ये १३४७ मोबाईल गहाळ झाले आहेत. पोलिसांनी ऑनलाईन तपास करून ३० ते ४० टक्के मोबाईल शोधले आहेत. 

७५६ मोबाईल शोधण्यात यशमोबाईल चोरी झाल्यानंतर संपूर्ण कागदपत्राच्या आधारे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर हा तपास सायबर विभागाकडे जातो. तक्रार मिळताच पोलीस मोबाईल ट्रेस करतात. मोबाईल ट्रेस झाल्यानंतर पोलिसांना शोध लावणे शक्य होते.  सन २०१९ मध्ये दोन हजार ९७९ पैकी १४८० तर सन २०२० मध्ये १३४७ पैकी ६५६ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

याठिकाणी सांभाळा मोबाईलचंद्रपूर येथील बस स्थानक, रेल्वे स्थानक येथून मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरी गेल्याची तक्रार आहेत. यासोबतच चंद्रपुरातील गोल बाजार, भाजी बाजार येथून मोबाईल चोरी गेल्याच्या तक्रारी आहेत. तर बाबुपेठ येथून जबरीने मोबाईल पळवल्याचाही तक्रारी आहेत.

५० टक्के मोबाईलचा शोध लागतच नाहीमोबाईल चोरी केल्यानंतर संपूर्ण कागदपत्राच्या आधारे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणे गरजेचे असते. परंतु बहुतांश जणांकडे कागदपत्र नसल्याने तक्रार करत नाही. तर बहुतेकांनी तक्रार केल्यानंतरही मोबाईल ट्रेस होत नसल्याचे कारण पोलिसांकडून सांगण्यात येते. त्यामुळे चोरी गेलेल्या ५० टक्के मोबाईलचा शोध लागत नसल्याचे वास्तव आहे.

मोबाईल चोरीला जाताच हे करामोबाईल चोरीला गेल्यानंतर तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार करा. मोबाईलमधील ई-मेल व इतर पासवर्ड बदलून घ्यावे, ऑनलाईन बँकिंग असल्यास त्वरित संबंधित बँकेला याची कल्पना द्यावी, खात्यातील व्यवहार बंद करावेत. आपण वापरत असलेला मोबाईल क्रमांक ब्लॉक करावा जेणेकरून गैरवापर होणार नाही.

टॅग्स :MobileमोबाइलThiefचोर