शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबा मार्गाच्या मध्यभागी पडलेले भगदाड धोक्याचा

By admin | Updated: July 14, 2017 00:26 IST

पद्मापूरच्या मोरघाट नाल्यापासून वळविण्यात आलेल्या ताडोबा मार्गाच्या मध्यभागी एक भगदाड पडले आहे.

अपघाताची शक्यता : लक्ष देण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कदुर्गापूर : पद्मापूरच्या मोरघाट नाल्यापासून वळविण्यात आलेल्या ताडोबा मार्गाच्या मध्यभागी एक भगदाड पडले आहे. त्यामुळे येथे केव्हाही मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकतेच केलेल्या या मार्गाच्या दुरवस्थेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पद्मापूर मोरघाट नाल्याच्या उजव्या बाजूने पूर्वी ताडोबाकडे जाण्याचा मार्ग होता. सेक्टर चार खुल्या कोळसा खाणीच्या विस्ताराकरिता हा मार्ग वळविण्यात आला. या मार्गाचे दोन-तीन वर्षाआधी बांधकाम झाले आहे. पद्मापूर कोळसा खाणीच्या कोल स्टॉकपासून पुढे गेल्यावर या मार्गाच्या अगदी मध्यभागी एक घातक खोलगट भगदाड पडले आहे. याचे स्वरूप छोटे असले तरीही त्या भोवतालचा भाग कमकुवत झाला आहे. त्यामुळे तो हळूहळू गंभीर रुप धारण करीत आहे. याशिवाय या मार्गावर या भगदाडापासून काही अंतरापर्यंत आतून भेगा पडल्याची एक खून उमटून दिसत आहे. या रस्त्यावरील डांबराचे आवरण फाटून येथे मोठी भेग पडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास येथे गंभीर अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. या मार्गाचे नुकतेच बांधकाम करण्यात आले आहे. याच मार्गावर परत एका ठिकाणी कालवट जवळ मोठे भगदाड पडले आहे. नवीन मार्गाची अशी दुरवस्था होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत असून तत्काळ या मार्गाच्या दुरवस्थेची कारणमीमांसा तपासून वेळीच या मार्गाची योग्य पद्धतीने दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.