शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात ‘लगानरुपी’ धान्याची वसुली

By admin | Updated: September 29, 2014 23:02 IST

शासन स्तरावरुन शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा होते. मात्र शासन प्रणालीतील काही स्वार्थी अधिकारी व राजकारण्यांमुळे कल्याणकारी योजनांपासून शेतकरी वंचित आहे.

शेतकऱ्यांची लूट : शेतीपयोगी साहित्याच्या लाकडाला मोबदला गोंडपिंपरी : शासन स्तरावरुन शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा होते. मात्र शासन प्रणालीतील काही स्वार्थी अधिकारी व राजकारण्यांमुळे कल्याणकारी योजनांपासून शेतकरी वंचित आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून ‘लगान’ च्या रुपात धान्य वसूल करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. वर्षभर शेती उपयोगी साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या लाकुडाच्या मोबदल्यात खंडीच्या मापाने धान्य वनकर्मचाऱ्यांना द्यावे लागत असल्याची माहिती मिळाली. जिल्हा सीमेवर वसलेल्या गोंडपिंपरी हा नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल व अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखल्या जातो. सदर तालुक्यातील बहुतांश जमिन वनाने व्यापली आहे. तालुक्यातील ८० टक्के लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. शेती या व्यवसायात अत्याधुनिक यंत्रासह प्राचिन काळापासून लाकडी साहित्य तयार केलेल्या साधनांचा वापर केला जातो. मात्र वनविभाग आगारात ग्रामीण शेतकऱ्यांना शहरी व्यापाऱ्यांपुढे किंमत बोली लावणे अवघड जात असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अशातच काही शेतकऱ्यांनी वनविभागाच्या ग्राम अंतर्गत कर्तव्य बजावणाऱ्या वनरक्षकांकडे लाकडाची मागणी केली असता त्याचा मोबदला म्हणून वनकर्मचारी ‘लगान’ च्या रुपात धान्याची मागणी केल्या जात असल्याची माहिती आहे.ग्रामीण भागातील शेतकरी आजही ‘लगान’ चुकवित असल्याचे शेतकऱ्यांकडून मियालेल्या माहितीवरुन समजते. या संदर्भात पीडित शेतकऱ्यांना आपण वरिष्ठस्तरर गाठून तक्रार का करीत नाही? असा प्रश्न उपस्थित केला असता शेती साहित्याचे लाकूड अगारातून मिळविणे फार अवघड असून पिढ्यांनपिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसारच खंडीच्या मापाने धान्य मोजून देत असल्याचे सांगितले. तसेच निस्तार काड्या व पाने तोडण्यासाठी सतत वनात जावे लागत असल्याने वनकायद्यात अडकविण्याची भिती देखील निर्माण होत असल्याची व्यथा काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.एकंदरीत या सर्व प्रकारावरुन ब्रिटीश हुकूमशाहीच्या आठवणी ताज्या होत असून ग्रामीण भागातील गंभीरर प्रकार शेतकऱ्यांच्या चांगलाच अंलगट येत आहे. (तालुका प्रतिनिधी)