शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय दूध शीतकरण केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर

By admin | Updated: December 28, 2015 01:28 IST

शासनाच्या उदासीन धोरणाला कंटाळून या तालुक्यातील दुग्ध उत्पादकांनी दुग्ध उत्पादक सहकारी संस्थाकडे पाठ फिरविली आहे.

नागभीड: शासनाच्या उदासीन धोरणाला कंटाळून या तालुक्यातील दुग्ध उत्पादकांनी दुग्ध उत्पादक सहकारी संस्थाकडे पाठ फिरविली आहे. परिणामी नागभीड येथील शासकीय दूध शीतकरण केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आला आहे.संपूर्ण जिल्ह्यात सर्वात जास्त दुधाचे उत्पादन नागभीड तालुक्यात होते. किंबहुना दुधाचे आगर म्हणूनही नागभीड तालुक्याची ओळख आहे. ही उत्पादन क्षमता लक्षात घेऊनच शासनाने नागभीड येथे दूध शीतकरण केंद्र मंजूर केले, पण खेदाची बाब अशी की, या शीतकरण केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन भरुन काढण्यासही हेशितकरण केंद्र महाग झाले आहे.या शीतकरण केंद्रावर अशी अवस्था प्राप्त होण्यास कर्मचारी नाही तर शासनाचे धोरण कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत या शीतकरण केंद्राला नागभीड आणि जवळच्या तालुक्यातून दुधाचा पुरवठा होत होता. पण तीन- तीन महिने दूध उत्पादकांचे वेतन अदा न करणे लहान-लहान कारणावरुन दूध उत्पादक आणि दूध उत्पादक संस्था चांगल्याच मेटाकुटीस आल्या होत्या. दरम्यान, तालुक्यात खासगी दूध कंपन्यांनी नागभीड तालुक्यात आपले पदार्पण केले. केंद्र शासनाच्या दरापेक्षा जास्त दर, दर १० दिवसांनी वेतन देऊन कंपन्यांनी प्रत्येक गावात आपल्या शाखा सुरु केल्या. प्रारंभी या शाखांना थोडा त्रास झाला. लवकरच या खासगी कंपन्यांनी तालुक्यातील दुग्ध उत्पादक सहकारी संस्थांना थंड करुन दूध उत्पादकांना आपल्या बाजूने वळविण्यात यश मिळविले. आजघडीला संपूर्ण नागभीड तालुक्यातील दुग्ध उत्पादक सहकारी संस्था डबघाईस आल्या असून ज्या बोटावर मोजण्याइतपत सहकारी संस्था जिवंत असतील, त्यांनीही खासगी कंपन्यांची कास धरल्याचे वृत्त आहे. परिणामी नागभीड येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राला दुधाचा पुरवठाच बंद झाल्यासारखा आहे. आठ- दहा वर्षाअगोदर १२ ते १४ हजार लीटर दुधाचा पुरवठा ज्या शीतकरण केंद्रात होत होता, त्याच शीतकरण केंद्रात आज केवळ हजार लिटर दुधाचा पुरवठा होत आहे. ही खरोखरच चिंताजनक बाब आहे. या उलट खासगी दूध कंपन्यांची स्थिती आहे. (तालुका प्रतिनिधी)