शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचा मोर्चा

By admin | Updated: July 6, 2014 23:52 IST

नगर परिषदेंतर्गत घरकूल योजनेचा लाभ अनुसूचित बीपीएलधारक व मागासवर्गीयांना मिळत आहे. मात्र वरोरा नगर परिषद अपवाद ठरत असून, त्यामुळे गोरगरिबांची गळचेपी होत आहे. शहरातील वीस

वरोरा : नगर परिषदेंतर्गत घरकूल योजनेचा लाभ अनुसूचित बीपीएलधारक व मागासवर्गीयांना मिळत आहे. मात्र वरोरा नगर परिषद अपवाद ठरत असून, त्यामुळे गोरगरिबांची गळचेपी होत आहे. शहरातील वीस वर्षांपासून वास्तव्य करीत असणाऱ्या नागरिकांना वीज, पक्क्या नालीचे बांधकाम, खुल्या जागेचा उपयोग बगीच्यासाठी करण्यात यावा, अशा विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे विदर्भ अध्यक्ष अजय रेड्डी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.शहर विविध समस्येने ग्रासले असून नगर परिषद दुर्लक्ष करीत आहे. शहरात २० वर्षांपासून राहात असलेल्या झोपडपट्टीवासीयांना स्थायी वीज देण्यात यावी, तसेच शहरात काही वॉर्डातील पक्क्या नाल्यांचे बांधकाम झाले नाही. ते त्वरित करून जनतेचे आरोग्य सुदृढ ठेवावे, नाल्याची साफसफाई करावी, वॉर्डात असलेल्या खुल्या जागेवर नगर परिषदेद्वारे उद्यान बनवून ती जागा कार्यान्वित करावी, नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला.परंतु प्रकल्प बंद असल्याने लाखो रुपयांचा खर्च वाया घालविला आहे. तो त्वरित कार्यान्वित करावा, जीएमआर, इस्पात कंपनीतून निघणारी पांढरी राख याचा उपयोग खड्डे बुजविण्यासाठी नंदोरी परिसरात करण्यात येत असल्यामुळे परिसरातील नागरिक तसेच शेतीवर परिणाम होत आहे. नाल्यात ही राख मिसळत असल्याने नागरिक व जनावरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. या राखेवर त्वरीत निर्बंध लावण्यात यावा, शालेय पोषण आहारातुन मुख्याध्यापक, शिक्षकांची मुक्तता करून वर्षानुवर्षे आहार शिजविणाऱ्या पूर्ववत कामावर ठेवण्यात यावे, अशा विविध मागण्यांचा समावेश होता. मोर्चा आंबेडकर चौकातून निघून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी, पालकमंत्री संजय देवतळे यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात अजय रेड्डी, आयटकचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, साचिका वांढरे, छाया मोहितकर, राजू गहीनेवार, सीमा पवार, संगीता झाडे, संतोष दास यांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)