शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळात गरिबांना मोफत धान्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

यावर्षी कधी नव्हे असे लोकांचे हाल झाले. मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा देशात संसर्ग झाला आणि वैश्विक महामारीचे लोण संपूर्ण देशभर पसरले. या विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने सरकारने देशभर लॉकडाऊन करीत संचारबंदी लागू केली. त्यामुळे सर्व कामे बंद झाली. उद्योगधंदे बंद झाले. यात रोजंदारी मजुरांचे हाल झाले. तब्बल तीन महिने त्यांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला.

ठळक मुद्देकुटुंबांचा झाला उदरनिर्वाह । तीन महिन्यात दोन लाख ३४ हजार क्विंटल धान्य मोफत

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देत केंद्र शासनाने अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना दरमहा प्रतिमाणसी पाच किलो तांदूळ व एक किलो डाळ मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार एप्रिल ते जून या तीन महिन्यात जिल्ह्यात दोन लाख २२ हजार क्विंटल तांदळाचे वितरण झाले. यासोबतच १२ हजार क्विंटल डाळही वाटप करण्यात आली आहे. या धान्यांमुळे कोरोना संसर्गाच्या संकटकाळात हाताला काम नसलेल्या रोजंदारी मजुरांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह होऊ शकला.यावर्षी कधी नव्हे असे लोकांचे हाल झाले. मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा देशात संसर्ग झाला आणि वैश्विक महामारीचे लोण संपूर्ण देशभर पसरले. या विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने सरकारने देशभर लॉकडाऊन करीत संचारबंदी लागू केली. त्यामुळे सर्व कामे बंद झाली. उद्योगधंदे बंद झाले. यात रोजंदारी मजुरांचे हाल झाले. तब्बल तीन महिने त्यांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. परिणामी सरकारला कार्डधारक व विनाकार्डधारकांनाही स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्याचे वितरण करावे लागले. जिल्ह्यात दररोज मजुरी करून त्यावर गुजराण करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अनेकांनी या योजनेचा लाभ घेत कुटुंबाचा गाडा तीन महिने कसाबसा हाकला. जिल्ह्यात ३६ हजार दारिद्ररेषेखालील कार्डधारक आहेत.त्यांना एप्रिल ते जून या तीन महिन्यात स्वस्त धान्य दुकानातून दोन लाख २२ हजार क्विंटल तांदूळ व १२ हजार क्विंटल डाळ मोफत देण्यात आली आहे.केशरी, शुभ्र कार्डधारकांनाही प्रतीक्षालॉकडाऊनच्या काळात केशरी आणि शुभ्र कार्डधारकांनाही मे आणि जून महिन्यांसाठी स्वस्त दरात राज्य शासनाने रेशनवरून धान्य उपलब्ध करून दिले होते. हा निर्णय दोन महिन्यांसाठीच होता. त्याची मुदत संपली आहे. सध्या लॉकडाऊन सुरूच आहे. ते आणखी किती दिवस सुरू राहील याचा अंदाज नाही. यामुळे राज्य शासन आणखी काही महिने या योजनेला मुदतवाढ देईल, याची केशरी व शुभ्रकार्डधारकांनाही प्रतीक्षा आहे.जिल्ह्यात एक नेशन एक रेशनजिल्ह्यात एक नेशन - एक रेशन योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. परराज्यातील कार्डधारकांना ‘नॅशनल पोर्टेबिलिटी’द्वारे धान्य देण्यात येणार आहे. तशा सूचना रेशन धान्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात परराज्यातील नागरिक राहात आहेत. त्यांचे रेशन कार्ड त्यांच्या राज्यात असले तरी त्यांना या योजनेद्वारे चंद्रपूर जिल्ह्यात धान्य उपलब्ध होणार आहे. मात्र संबंधित नागरिकांचे कार्ड कोणते आहे, त्यानुसार महाराष्ट्रात किती धान्य देय आहे, तितकेच धान्य संबंधिताला देण्यात येणार आहे. रेशन कार्ड नसले तरी संबंधिताला ‘नॅशनल पोर्टेबिलिटी’द्वारे बायोमेट्रिक पद्धतीने धान्य मिळणार आहे. संबंधित व्यक्तीला बायोमेट्रिकद्वारे त्याचे रेशन कार्ड दुकानाकडे उपलब्ध करता येणार आहे. कार्डवर एकूण किती लोक आहेत, त्यापैकी किती लोक जिल्ह्यात राहतात, तितक्याच लोकांचे धान्य बायोमेट्रिकद्वारे या जिल्ह्यात उपलब्ध होईल. कार्डवर नावे असलेल्या उर्वरित लोकांना त्यांचे धान्य त्यांच्या राज्यात घेता येणार आहे. या सर्वांची नोंद आॅनलाईन पद्धतीने होणार आहे.कार्ड नसलेल्यांनाही ११,६०० क्विंटल तांदूळज्यांच्याकडे कुठलेही कार्ड नाही. अशांना कोरोना संकटकाळात मे आणि जून महिन्यात मोफत अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे. कार्ड नसलेल्या मजूरवर्गीय लोकांना ११ हजार ६०० क्विंटल तांदूळ व ६६० क्विंटल चना मोफत दिला आहे.एक नेशन-एक रेशन योजनेद्वारे परराज्यातील कार्डधारकांनाही जिल्ह्यात धान्य देण्यात येणार आहे. त्यानुसार अशा कार्डधारकांनी मागणी केल्यास त्यांना धान्य देण्याबाबत दुकानदारांना सूचना दिल्या आहेत. मागील तीन महिन्यात कार्डधारकांना दोन लाखांहून अधिक क्विंटल तांदूळ व १२ हजार क्विंटल डाळ मोफत देण्यात आली आहे-राजेंद्र मिस्कीन,जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या