शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणानंतर प्रस्थापितांची नव्याने मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 05:00 IST

वास्तविक या ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच पार पडल्या असत्या. या निवडणुकीसंदर्भात प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली होती.  वार्ड निश्चितीपासून तर वार्डातील आरक्षणापर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. गावपातळीवरील पुढाºयांनीही निवडणुकीची तयारी चालविली होती. मात्र ऐनवेळी कोरोनाने डोके वर काढल्याने निवडणूक कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला आणि अनेकांच्या इच्छेवर पाणी फेरल्या गेले.

ठळक मुद्दे१५ जानेवारीला मतदान : ६२९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नुकतेच प्रशासक नियुक्त करण्यात आलेल्या ग्रामपंचायातींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायती आहेत.  या निवडणुका १५ जानेवारी २०२१ रोजी होत आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आरक्षणानंतर अनेक प्रस्थापितांना फटका बसला होता. आता निवडणूक जाहीर झाल्याने तेदेखील नव्याने मोर्चेबांधणी करू लागले आहेत. वास्तविक या ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच पार पडल्या असत्या. या निवडणुकीसंदर्भात प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली होती. वार्ड निश्चितीपासून तर वार्डातील आरक्षणापर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. गावपातळीवरील पुढाºयांनीही निवडणुकीची तयारी चालविली होती. मात्र ऐनवेळी कोरोनाने डोके वर काढल्याने निवडणूक कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला आणि अनेकांच्या इच्छेवर पाणी फेरल्या गेले. दरम्यान, ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपल्याने या ग्रामपंचायतींवर शासनाकडून प्रशासक नियुक्त करण्यात आले होते.  प्रशासकामुळे विकास खुंटल्याचा आरोप होत होता.

संगणकीकृत पध्दतीने नामनिर्देशन होईल दाखलया सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकीकृत पध्दतीने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहे, नामनिर्देशन पत्र भरण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाचे वेबसाईटवर उपलब्ध आहे.  नामनिर्देशन पत्र २३ ते ३० डिसेंबर २०२० (२५, २६ व २७ डिसेंबरची सार्वजनिक सुटी वगळून) या कालावधीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. संगणकीकृत पध्दतीने नामनिर्देशन पत्राची प्रत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

राजकीय हालचालींना वेगआता निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच गावपातळीवरील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. यापूर्वीच्या सरपंचांची निवड थेट जनतेमधून करण्यात आली होती.पण आता सरपंचांची निवड सदस्यांमधून होणार असल्याने आणि २३ डिसेंबर २०२० पासूनच नामांकन दाखल करण्यास सुरूवात होणार असल्याने येत्या दोन चार दिवसांत गावपातळीवरील राजकीय हालचाली चांगल्याच गती घेतील, असे संकेत आहे. 

असा असणार निवडणूक कार्यक्रमनिवडणूक कार्यक्रमानुसार १५ डिसेंबर २०२० रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. २३ डिसेंबर २०२० पासून ३० डिसेंबर २०२० पर्यंत नामांकन सादर करता येणार आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी नामांकनाची छाणनी होईल. ४ जानेवारी २०२१ रोजी नामांकन परत घेता येईल. त्याचबरोबर उमेदवारवारांना चिन्ह नेमून देण्यात येतील. मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी आणि मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे.

आचारसंहिता लागूजिल्ह्यात १५ जानेवारी २०२१ रोजी ६२९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष व उमेदवारांवर निवडणूक आयोगाची नजर असणार आहे. शिवाय या ग्रामपंचायतींमध्ये ११ डिसेंबर २०२० पासून आचारसंहिता अंमलात आणण्यात आलेली आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक