शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

प्रवास भाडे सवलतीसाठी आता ‘आधार’ची सक्ती

By admin | Updated: February 3, 2015 22:52 IST

सर्व घटकांचा सर्वकष विकास व्हावा, याकरिता एसटी महामंडळद्वारे विविध प्रकारच्या प्रवास भाडे सवलत योजना प्रदान केल्या जातात. मात्र, अनधिकृतरीत्या तयार करण्यात आलेल्या

एसटी महामंडळाचा पुढाकार : बोगस कार्डधारकांवर बसणार वचकचंद्रपूर : सर्व घटकांचा सर्वकष विकास व्हावा, याकरिता एसटी महामंडळद्वारे विविध प्रकारच्या प्रवास भाडे सवलत योजना प्रदान केल्या जातात. मात्र, अनधिकृतरीत्या तयार करण्यात आलेल्या बोगस कार्डच्या माध्यमातून या योजनांचा लाभ घेतला जात असल्याने एसटी महामंडळाच्या तिजोरीवर ताण पडत आहे. यावर लगाम कसण्यासाठी एसटी महामंडळ सरसावले असून, प्रवास भाडे सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना यापुढे आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र दाखविणे बंधनकारक राहील. त्याची त्वरित अंमलबजावणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समाजातील विविध सामाजिक घटकांना सामाजिक बांधीलकीच्या नात्याने एसटी महामंडळाद्वारे सुरुवातीच्या कालावधीपासून विविध प्रवास भाडे सवलत योजना प्रदान केल्या जातात. विशेषत: विविध विद्यार्थी वर्गास विविध कारणांसाठी प्रवास भाडे सवलत अनुद्देय करून साक्षरतेचे प्रमाण वाढवून राज्याच्या प्रगतीस हातभार लावला आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य सैनिक, दलितमित्र पुरस्कार्थी, आदिवासी सेवक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी आदींच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य करणाऱ्या पुरस्कारर्थीना विनामूल्य एसटी प्रवास सवलत प्रदान केली जाते. वयाची ६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आणि अंध, अपंग व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींनादेखील एसटी प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. मात्र, जनसेवेचे हे कार्य एसटी महामंडळाच्या अंगलट येत असून, बनावट कार्ड तयार करून सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांचा सुळसुळाट झाला आहे. प्रवास भाड्यात सवलत मिळविण्यासाठी बनावट कार्ड दाखवून प्रवाशांकरवी एसटीला चुना लावला जात असल्याची हजारो प्रकरणे आढळून आली आहेत. बनावट कार्डधारक प्रवाशांची कमतरता नाही. अंध, अपंग आणि ज्येष्ठ नागरिक सवलतींचे हजारो बनावट कार्ड आजतागायत जप्त करण्यात आलेत. यावर सरसकट लगाम हे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता बोगस कार्डधारकांवर वचक बसणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)