एक दिवस कोरडा पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:00 AM2020-08-13T05:00:00+5:302020-08-13T05:01:15+5:30

नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळून पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ धुवावे, तसेच घरात व परिसरात स्वच्छता ठेवल्यास आजारापासून दूर राहता येईल. विशेष ेम्हणजे, दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मनपाने झोन क्र. २ अंतर्गत १५ कामगारांचे पथक तयार करून बाबूपेठ, महाकाली भिवापूर व भानापेठ प्रभागात डेंग्यू व मलेरिया निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Follow dry one day | एक दिवस कोरडा पाळा

एक दिवस कोरडा पाळा

Next
ठळक मुद्देमहानगर पालिका : कोरोना काळात सांभाळा आरोग्य

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरासह जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. या पावसाळ्यात साथीच्या आजारांचा धोकाही वाढला आहे. दूषित पाण्याचा पुरवठा, उघड्यावरील खाद्यपदार्थाचे सेवन, दूषित पाण्यातून प्रवास केल्यानंतर घेण्यात न आलेली काळजी, अशा अनेक कारणांमुळे साथीच्या आजाराची लागण होते. विशेषत: पाणी साचत असलेल्या परिसरात डेंग्यू मलेरियासारखे आजार पसरण्याची भीती असल्याने प्रत्येकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर राखी कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.
साथीच्या आजारांना कारणीभूत डासांच्या उत्पतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी आवश्यक उपययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळून पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ धुवावे, तसेच घरात व परिसरात स्वच्छता ठेवल्यास आजारापासून दूर राहता येईल. विशेष ेम्हणजे, दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मनपाने झोन क्र. २ अंतर्गत १५ कामगारांचे पथक तयार करून बाबूपेठ, महाकाली भिवापूर व भानापेठ प्रभागात डेंग्यू व मलेरिया निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली आहे.
काही कामगार फवारणी, काही धुरळणी तर इतर कामगारांद्वारे नागरीकांच्या घरी पाण्याने भरलेले कुलर, पाण्याचे टाके, ड्रम रिकामे करून त्यात आबेट नावाचे औषध सोडत आहे त्यामुळे डासांची अंडी नष्ट होण्यास मदत मिळत आहे. मात्र तरीसुद्धा नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, व महापौर कंचर्लावार यांनी केले आहे.

मादी घालते तीन वेळा अंडी
डासांचे आयुष्य तीन ते सहा आठवड्यांचे असते. या आयुष्यात डासांची मादी साधारणता, तीन वेळा अंडी घातले. प्रत्येक वेळी साधारणत: ८० ते १०० अंडी घातली जातात. ही अंडी शुल्क अवस्थेतही वर्षभरापर्यंत राहू शकतात. पाण्याशी संपर्क आल्यानंतर ही अंडी फलित होवू शकतात.

डासांची अंडी नष्ट करा
पिंप, ड्रम, बादल्यांमधील पाणी सात दिवसांतून किमान एक वेळा पूर्णपणे बदला. आठवड्यातून किमान एकदिवस कोरडा पाळा. पाणी साठवण्यिाची भांडी कोरडी ठेवून ती कोरड्या फडक्याने पुसून घ्या. जेणेकरुन भांड्याच्या कडांना चिटकलेली डासांची अंडी नष्ट होतील.

डासांना अंडी घालण्यासाठी चमचाभर पाणीही पुरेसे
मलेरिया व डेंग्यू पसरवित असलेल्या डासाची मादी ही आपली अंडी स्वच्छ व साचलेल्या पाण्यातच घातले. ही अंडी घालण्यासाठी चमचाभर साचलेले पाणीही पुरेसे असते. अंडी घातल्यापासून साधारणपणे आठवड्याभरात डासांची उत्पती होते. हे लक्षात घेऊन आपल्या घरात तसेच परिसरात पाणी साचू देऊ नये, असे आवाहन मनपा आरोग्य विभागाने केले.

Web Title: Follow dry one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.