औद्योगिक कंपन्यांची फ्लॉय अ‍ॅश मुख्य रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST2020-07-17T05:00:00+5:302020-07-17T05:00:58+5:30

औद्योगिक कंपण्यांमधून दररोज हजारो टन राख निघते. या राखेची विल्हेवाट लावण्यासाठी काही ट्रान्सपोर्ट कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. सदर राख सिमेंट कंपनी व सिमेंट उद्योग परिसरातच टाकण्याचा नियम आहे. मात्र काही सिमेंट कंपन्या व उद्योगांनी पैसे वाचविण्यासाठी वाटेल त्या ठिकाणी फ्लॉय अ‍ॅश टाकून मोेकळे होत आहेत. औद्योगिक कंपन्यांनी राखेची विल्हेवाट लावण्याचे काम कंत्राटदारांना सोपविल्याने शहरातील ले-आऊट, खुल्या जागेत टाकत आहेत.

Fly ash of industrial companies on the main road | औद्योगिक कंपन्यांची फ्लॉय अ‍ॅश मुख्य रस्त्यावर

औद्योगिक कंपन्यांची फ्लॉय अ‍ॅश मुख्य रस्त्यावर

ठळक मुद्देनियमांना ठेंगा : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : विविध औद्योगिक कंपन्यांतून निघणारी फ्लॉय अ‍ॅश वर्दळीच्या रस्त्यावर टाकल्या जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता मोहीम सुरू असताना हा प्रकार घडत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
औद्योगिक कंपण्यांमधून दररोज हजारो टन राख निघते. या राखेची विल्हेवाट लावण्यासाठी काही ट्रान्सपोर्ट कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. सदर राख सिमेंट कंपनी व सिमेंट उद्योग परिसरातच टाकण्याचा नियम आहे. मात्र काही सिमेंट कंपन्या व उद्योगांनी पैसे वाचविण्यासाठी वाटेल त्या ठिकाणी फ्लॉय अ‍ॅश टाकून मोेकळे होत आहेत. औद्योगिक कंपन्यांनी राखेची विल्हेवाट लावण्याचे काम कंत्राटदारांना सोपविल्याने शहरातील ले-आऊट, खुल्या जागेत टाकत आहेत. शहरात अ‍ॅश टाकण्यासाठी जागाच मिळत नसल्याचे पाहून चंद्रपूर-नागपूर महामार्गावर रस्त्याच्या कडेला फ्लॉय अ‍ॅश टाकून कंत्राटदार मोकळे होतात. त्यामुळे शेतीवर विपरित परिणाम झाला आहे. सर्वत्र कोरोना विषाणूचे थैमान सुरू आहे. कोरोनोवर मात करण्यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. शासनाकडून सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपायायांना नागरिकांकडून सहकार्य मिळत असताना औद्योगिक कंपन्यातून निघणारी धोकादायक राख गावाशेजारीच टाकली जात आहे. त्यामुळे पिण्याचे पाणीही दुषित होवू शकते.

परवागनी मिळालेल्या जागेवरच कंपन्यांना फ्लॉय अ‍ॅश टाकणे बंधनकारक आहे. नागरिकांनी तक्रारी केल्यास कारवाई करू.
- सुभाष शिंदे, उपविभागीय अधिकारी, वरोरा
फत्तापूर व पिंपळगाव मार्गावरील खड्डे बुजविण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, परिसरातील काही लघु उद्योजक आमच्याकडून मोफत राख नेऊन बाहेर खासगी कामाकरिता विकतात. अशांविरूद्ध आम्ही तक्रारी केल्या आहेत.
- विनोद पुसदकर, जीएमआर कंपनी
भद्रावती तालुक्यातील केवळ नंदोरी परिसरातील खड्डे बुजविण्याची परवानगी मिळाली आहे. फत्तापूर मार्गावर आमच्या कंपनीचा एकही ट्रक जात नाही.
- मंगेश चहारे, वर्धा पॉवर कंपनी

Web Title: Fly ash of industrial companies on the main road