शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

विविध क्षेत्रातील पाच जणांचा सत्कार

By admin | Updated: October 29, 2015 01:28 IST

सामाजिक तसेच आपापल्या क्षेत्रात आपल्या कार्याने ठसा उमटविणाऱ्या समाजातील विविध क्षेत्रांमधील पाच जणांचा सत्कार ...

शहीद अशफाक उल्लाह जयंती कार्यक्रम : विविध विषयांवर झाले मार्गदर्शनबल्लारपूर : सामाजिक तसेच आपापल्या क्षेत्रात आपल्या कार्याने ठसा उमटविणाऱ्या समाजातील विविध क्षेत्रांमधील पाच जणांचा सत्कार येथील शहिद अश्फाकखान मेमोरियल मल्टीपर्पज सोसायटीद्वारे सोमवारी करण्यात आला. शहीद अश्फाक उल्लाह खान यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सेवानिवृत्त जिल्हाधिकारी हाजी शफीक अहमद हे होते.राजुरा तालुक्यातील बीबी येथील प्रसिद्ध हाडवैद्य डॉ.गिरीधर लटारी काळे, इको-प्रोचे पर्यावरण प्रेमी बंडू धोतरे, लोकमतचे बल्लारपूर तालुका प्रतिनिधी वसंत खेडेकर, गोंडवाना विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग शाखेचे डीन प्रा.डॉ.जाफर जावेद खान, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष तसेच व्यापारी जैनुल आबेदिन ऊर्फ बाबाभाई या पाच जणांचा शफीक अहमद यांच्या हस्ते शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आपल्या भावना व्यक्त करीत काही अनुभव कथन केले. युवकांनी समाज कार्यात पुढे येण्याचे तद्वतच आपण ज्या भागात राहतो. त्या भागाचा इतिहास जाणून घ्या, वास्तूंचे अवलोकन करा, असे आवाहन युवकांना केले.बंडू धोतरे यांच्या कार्याची ध्वनिफीत दाखविण्यात आली. शफिक अहमद यांनी सोसायटीच्या या उपक्रमाची प्रशंसा करीत समाजातील बंधुभाव वृद्धिंगत करण्याकरिता असे कार्यक्रम नित्य घेणे गरजेचे असल्याचे म्हणाले. प्रास्ताविक भाषणात या संस्थेचे अध्यक्ष शरीफ गुरुजी यांनी १९२० च्या काळात स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या शहीद अश्फाक उल्लाह खान यांच्यासोबत माहिती सांगत, सत्कारामागची भूमिका मांडली. महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद लोणारे यांचेही प्रासंगिक भाषण झाले. संचालन नासिर खान यांनी तर आभार प्रदर्शन अब्दुल सलिम यांनी केले. मो.गयास, अ‍ॅड.नाजीम खान, सैय्यद आसिफ, भुरूभाई, सैफुल्लाह बेग, सलमान खान, मो. आतिक, सै. अथहर अली, सोहेल खान, रियाज भाई, राजू मजगवळी, मधुसूदन राव, समीर खान, रमीज अहमद, देवीदास धानोरकर आदींनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)