शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्य व्यवसाय संस्था धोक्यात

By admin | Updated: December 20, 2014 00:58 IST

मासेमारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या भोई समाजबांधवावर शासनाच्या अन्यायकारक धोरणांमुळे संकट कोसळले आहे.

मंगेश भांडेकर चंद्रपूरमासेमारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या भोई समाजबांधवावर शासनाच्या अन्यायकारक धोरणांमुळे संकट कोसळले आहे. परंपरागत व्यवसाय आता बंद करण्याची पाळी भोई समाजावर आली असून जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय संस्थाही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय करणाऱ्या १६१ संस्था नोंदणीकृत आहेत. यापैकी नऊ संस्था बंद पडल्या असून १५२ संस्था नाममात्र कागदावर कार्यरत आहे. या संस्थांना मासेमारीसाठी तलाव मिळत नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद सिंचाई विभागाचे १ हजार ५६१ तलाव तर पाटबंधारे विभागाचे ९४ तलाव आहेत. मात्र, यापैैकी शेकडो तलावांची वर्षानुवर्षे दुरुस्ती न झाल्याने तलावात गाळ साचली आहे. त्यामुळे पाणी साचून राहत नाही. परिणामी मासेमारी करण्यात अडचणी येत आहेत. तलावातील गाळ उपसा करण्यासाठी भोई समाज बांधवांकडून शासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरु आहे. मात्र, अद्यापही कार्यवाही झालेली नाही. मासेमारी करण्याचे अधिकार त्या तालावाचा ठेका घेणाऱ्यांनाच असले तरी गावातील दुसरे नागरिकही चोरट्या मार्गाने मासेमारी करीत असतात. त्यामुळे मासेमारीच्या उत्पन्नात घट येत आहे. मासेमारीत बंगाली बांधवही उतरल्याने अतिरीक्त पैसे देऊन मासेमारीसाठी तलाव खरेदी करीत आहेत. आर्थिक भांडवलाअभावी मत्स्य व्यवसाय संस्था अतिरीक्त पैसे भरु शकत नाही. परिणामी बंगाली बांधवाला मासेमारीचे अधिकार मिळत आहेत.पावसाळी जल क्षेत्र अधिक उन्हाळी जल क्षेत्र भागीला दोन या सुत्रानुसार तलावाची किंमत ठरत असते. मात्र, मासेमारीसाठी तलाव ठेक्याने मिळविले जात आहे.पेसा कायदा मारकशासनाने राज्यातील १३ जिल्ह्यात पेसा कायदा लागू केला आहे. या कायद्याने तलावांची मालकी ग्रामपंचायतीकडे जाणार आहे. तलावाची मालकी मिळाल्यानंतर ग्रामपंचायत आपल्या मर्जीने मासेमारी करण्याचे अधिकार सोपविणार आहे. त्यामुळे मासेमारीसाठी ग्रामसभेने सर्वप्रथम मत्स्य व्यवसाय संस्थाना प्रथम प्राधान्य द्यावे. अन्यथा भोई समाजाचा परंपरागत व्यवसाय हिरावला जाणार आहे. मत्स्य व्यवसाय संस्थाना हवे अनुदानअवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थती निर्माण झाल्यास शासनाकडून शेतकऱ्यांना मदत दिली जाते. मात्र, अतिवृष्टी होऊन तलाव फुटला, मत्स्य बीज वाहून गेले अशा परिस्थीत संस्थेचे मोठे नुकसान होते. मात्र, नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे शासनाने मत्स्य व्यवसाय संस्थाना नुकसान भरपाई देण्याची गरज आहे.