जिल्ह्यातील मुलींची पहिली शाळा टाकणार कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 06:00 AM2020-02-19T06:00:00+5:302020-02-19T06:00:40+5:30

ब्रिटिशकाळात सन १८७९ रोजी ब्रिटिश अधिकारी कर्नल लूईस स्मिथ यांनी मुलींच्या पहिल्या शाळेची स्थापना केली. सुरूवातीला ही शाळा झोपडीत भरत होती. त्यानंतर सन १८८८ रोजी शाळेसाठी प्रशस्त इमारत बांधली. या इमारतीत मुले-मुली शिक्षण घेत होते. स्वातंत्र्यानंतर या इमारतीत जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली. सध्या ही इमारत जीर्ण झाली आहे.

The first girls' school in the district | जिल्ह्यातील मुलींची पहिली शाळा टाकणार कात

जिल्ह्यातील मुलींची पहिली शाळा टाकणार कात

Next
ठळक मुद्देबाळू धानोरकर यांचे प्रयत्न : मुख्यमंत्र्यांकडे विशेष निधीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे ब्रिटीशांनी १३२ वर्षांनी उभारलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेचे सौंदर्यीकरण करून मॉडेल शाळा बनविण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विशेष निधीची मागणी केली.
महाराष्ट्र-तेलंगणा राज्यात धाबा गावाची ‘संतनगरी’ अशी ओळख आहे. येथे श्री संत परमहंस कोंडय्या महाराज यांचे देवस्थान आहे. ब्रिटिशकाळात सन १८७९ रोजी ब्रिटिश अधिकारी कर्नल लूईस स्मिथ यांनी मुलींच्या पहिल्या शाळेची स्थापना केली. सुरूवातीला ही शाळा झोपडीत भरत होती. त्यानंतर सन १८८८ रोजी शाळेसाठी प्रशस्त इमारत बांधली. या इमारतीत मुले-मुली शिक्षण घेत होते. स्वातंत्र्यानंतर या इमारतीत जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली. सध्या ही इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे इमारतीचे जतन आणि सौंदर्यीकरण करून जिल्ह्यातील उज्ज्वल शैक्षणिक इतिहासाची ओळख व्हावी, याकरिता खासदार धानोरकर यांनी प्रयत्न सुरु केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निधीची मागणी केली असून महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण शाळा अशी ओळख निर्माण करण्यासाठी सरसावले आहेत.
 

Web Title: The first girls' school in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा