महापारेषण वीज उपकेंद्रात आगीचे तांडव

By Admin | Updated: April 2, 2016 00:46 IST2016-04-02T00:46:47+5:302016-04-02T00:46:47+5:30

तालुक्यातील केरसी या गावाजवळ असलेल्या वीज उपकेंद्रात शॉक सर्किटमुळे आग लागली

Fire extinguisher in Maha Transmission Power Station | महापारेषण वीज उपकेंद्रात आगीचे तांडव

महापारेषण वीज उपकेंद्रात आगीचे तांडव

शॉर्ट सर्किटमुळे आग लागली : केसरी येथील घटना, अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा
वरोरा : तालुक्यातील केरसी या गावाजवळ असलेल्या वीज उपकेंद्रात शॉक सर्किटमुळे आग लागली. त्यामुळे या उपकेंद्रात जिकडे तिकडे आगीचे तांडव सुरू होते. ही घटना १ एप्रिल रोजी दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा घटनेला जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वरोऱ्यापासून सात किलोमीटर अंतरावर महापारेषण विद्युत उपकेंद्र ४०० केव्ही व २०० केव्ही असून औद्योगिक वसाहतीत असलेल्या जीएमआर पावर कंपनीत निर्माण होणारी वीज या उपकेंद्रात जमा होऊन राज्यात पुरवठा केला जातो. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे उपकेंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला आहे.
शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे कचऱ्याला आग लागली आणि कर्मचारी व अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. घटनेची माहिती वरोरा नगरपरिषदेच्या अग्निशमक दलाला दिली तसेच जीएमआर कंपनीचेही अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही अग्निशमन दल घटनास्थळावर पोहोचण्यापूर्वी आगीने उग्र स्वरूप धारण केले होते. त्यामुळे आग विझविण्यासाठी दोन्ही अग्निशमक दलाने शर्तीचे प्रयत्न केले.
आग काही प्रमाणात आटोक्यात आल्यानंतर दोन्ही अग्निशमन दलाने वरोरा येथील फिल्टर टाकीवर जावून पुन्हा टँकर भरुन घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात पूर्णपणे यश आले. घटनास्थळावर सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत मसराम, वाहतूक विभागाचे सुधीर तिवारी, प्रकाश दरेकार, मंगेश शेंडे, सादीक शेख यांनी आगीमुळे कोणतीही जीवीतहानी होणार नाही, यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Fire extinguisher in Maha Transmission Power Station