शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कॅमेरा लावणाऱ्या प्राध्यापकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2016 00:50 IST

महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात प्राध्यापकाने पेन कॅमेरा लावला होता.

मुलींच्या वसतिगृहातील प्रकार : प्राध्यापक फरार, वरोरा पोलीस मागावर वरोरा : महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात प्राध्यापकाने पेन कॅमेरा लावला होता. या कॅमेऱ्यामध्ये प्राध्यापक स्वत: फोटो सहीत अडकल्याचे प्रकरण मागील काही दिवसांपासून सुरू होते. या घृणास्पद प्रकाराची सर्वच स्तरावरुन निंदा केली जात होती. अखेरीस या प्राध्यापकावर वरोरा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून फरार प्राध्यापकाचा वरोरा पोलीस शोध घेत आहेत.वरोरा शहरालगतच्या आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत एका प्राध्यापकाने आपल्यास महाविद्यालयातील मुलींच्या स्वच्छतागृहात पेन कॅमेरा लावला होता. हा पेन कॅमेरा मुलींच्या हातात लागल्याने तो प्राचार्याकडे सुपूर्द करण्यात आला. या कॅमेऱ्यामध्ये लावणाऱ्या प्राध्यापकाचा फोटो आल्याने संस्थेचा संशय बळावला. संस्थेने प्राध्यापकास तत्काळ राजीनामा देण्यास सांगताच, प्राध्यापकाने स्वत: राजीनामा देवून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सर्वप्रथम ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्याने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली होती. सर्वच स्तरावरुन या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. वरोरा शहर शिवसेनेच्या वतीने प्राध्यापकावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा वरोरा शहरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. तर भाजपाच्या वतीने केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना निवेदन देवून प्राध्यापकावर कठोर कारवाईची मागणी केली गेली होती. प्रतीश आत्माराम गंधारे असे प्राध्यापकाचे नाव असून तो विवाहित आहे. वरोरा शहरातील आनंदवन चौक नजीकच्या गजानन नगरमध्ये किरायाने राहत असून तो मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील कुंभा येथील रहिवासी आहे. या प्राध्यापकाचे महाविद्यालयीन शिक्षण व प्रशिक्षण वरोरा शहरातील महाविद्यालयात झाले. प्रारंभी घड्याळी तासिकेने शिकविल्यानंतर नुकताच स्थायी झाला होता. अशा या प्रतिश गंधारे प्राध्यापकावर सहाय्यक निरीक्षक वैशाली ढाले यांच्या तक्रारीवरुन कलम ३५४, ३५४ (फ) (ड) आयटी अ‍ॅक्ट ६६ (ई) भादंविने गुन्हा वरोरा पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला आहे. दरम्यान बुधवारी होणारे शिवसेनेचे आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)