शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

धारोष्ण गाय दूध तपासणीची आकडेवारी बोगस

By admin | Updated: December 18, 2014 22:51 IST

सहा सदस्यीय समिती गठीत करून धारोष्ण गाय दुधाची तपासणी करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश होते. मात्र, पर्यवेक्षकांना पाठवून दुग्ध सोसायटी केंद्रावर शेतकरी दुध उत्पादकाचे नमुने घेण्यात आले.

बी.यू. बोर्डेवार - राजुरासहा सदस्यीय समिती गठीत करून धारोष्ण गाय दुधाची तपासणी करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश होते. मात्र, पर्यवेक्षकांना पाठवून दुग्ध सोसायटी केंद्रावर शेतकरी दुध उत्पादकाचे नमुने घेण्यात आले. त्यामुळे दूध तपासणीची आकडेवारी बोगस असल्याची माहिती आता समोर आली आहे. पर्यवेक्षकांनी दुधाचे नमुने योजनेच्या गुण नियंत्रण कक्षाकडे पाठवून तपासणी अहवाल शासनाला सादर केला. नागपूर विभागात झालेल्या या तपासणीत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, तालुकास्तरीय रसायनशास्त्रज्ञ, जिल्हास्तरीय दुग्ध शाळेतील शाळा रसायन सहाय्यक, स्थानिक शेतकरी, दुध संघाचा प्रतिनिधी हे सर्व व्यक्ती गावामध्ये जाऊन गाईच्या दुधाचे नमुने घ्याला पाहीजे होते. परंतु, नागपूरसह बऱ्याच ठिकाणी नमुने जागेवरच घेण्यात आले आहेत, हे स्पष्ठ होत आहे. काही अधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या योजनेला बगल देऊन गाईची तपासणीच केली नाही. त्यामुळे गुणनियंत्रण पत्र क्रमांक २०१२/५४/६२२ नुसार गाय दुधाची विभागवार गुणप्रत तपासणी करण्यासाठी प्रत्यक्ष काढलेल्या धारोष्ण गाय दुधाची तपासणी करून अहवाल सादर करावयाचा होता. परंतु प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी नागपूर यांना उपआयुक्त दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी पत्र पाठवून प्रत्येक गावातील १० तर प्रत्येक तालुक्यात १०० नमुने घेऊन अहवाल पाठवण्यास सांगितले. परंतु, वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही अद्याप अहवाल मिळाला नसल्याचे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे नागपूर विभागातील अधिकारी प्रत्यक्ष गाईचे दुध न काढता दुध डेअरीवरील दुधाचे नमुने घेतल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे शासकीय कार्यक्रमात दुग्ध अधिकारी हयगय करीत असल्याचे निष्पन्न होत आहे.भेसळ प्रतिबंधात्मक कायदा १९५४ नुसार गाईच्या दुधात कमीत कमी ७.५ टक्के फॅट, ८.५ टक्के घनघटक असणे आवश्यक आहे. परंतु, गाईच्या दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ दिसुन येत आहे. शासनाने गुणनियंत्रणात वाढ व्हावी यासाठी दुग्ध विकासासाठी करोडो रुपये खर्च केले. मात्र, या योजनेचा फायदा शेतकरी व सामान्य नागरिकांना पाहीजे त्या प्रमाणात मिळाला नाही. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठांकडून चौकशी होणे गरजेचे आहे.