शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता करवाढविरोधातील आंदोलनाचा पाचवा दिवस

By admin | Updated: March 12, 2016 01:22 IST

चंद्रपूर शहर महानगरपालिकेने मालमत्ता करात चार ते पाच पट वाढ केली आहे. यामुळे नागरिकांचे कंबरडेच मोडले

आंदोलन आणखी तीव्र : मनपाने करवाढ मागे घ्यावीचंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेने मालमत्ता करात चार ते पाच पट वाढ केली आहे. यामुळे नागरिकांचे कंबरडेच मोडले असून ही वाढ अन्यायकारक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या करवाढीविरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीच्या वतीने ७ मार्चपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. शुक्रवार उपोषणाचा चौथा दिवस असून आंदोलन आणखी तीव्र होत आहे.काल गुरुवारी काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता लोढीया, लालुमती यादव, तारावती यादव, रमाबाई अहिर उपोषणाला बसल्या होत्या. माजी खासदार नरेश पुगलिया, युवा नेता राहुल पुगलिया, शहर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष गजानन गावंडे, डॉ. महावीर सोईतकर यांच्या हस्ते लिंबूपाणी देऊन दुसऱ्या दिवशी बसलेल्या उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडविण्यात आले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी उपोषणास बसणाऱ्या नगरसेवक राजेश रेवेल्लीवार, देवीदास गेडाम, श्रीनिवास पारनंदी व भारत जंगम यांचे माल्यार्पण करून स्वागत करण्यात आले.वाढलेल्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेला ही करवाढ आणखी त्रस्त करणारी आहे. लहान मोठे व्यापारी, फुटपाथवरील कपडे विक्रेता, चहा टी स्टॉल किंवा हातठेलाधारक यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. हे लहान मोठे व्यापारी हातावर आणून पानावर खातात. एखाद्या छोटेखानी घरात त्यांचे वास्तव्य असते. मात्र आता त्या मालमत्तेसाठी त्यांचा चार ते पाच पट कर भरावा लागणार आहे. यामुळे ते आर्थिक कोंडीत सापडले आहेत. महानगरपालिकेने पूर्वीच्या कराप्रमाणे कर आकारणी करावी. जेणेकरून गोरगरीबांची उपासमार होणार नाही. त्यांना त्रास होणार नाही. जनतेच्या हितासाठी मनपाचे धोरण असावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. नागरिकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीने पुढाकार घेऊन ७ मार्चपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. (शहर प्रतिनिधी)