वन अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शेतीची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 06:00 AM2019-12-06T06:00:00+5:302019-12-06T06:00:48+5:30

यासाठी शेती परिसरात सफाई करण्यात आली असून कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी वनविभाग सातत्याने शिवाराकडे लक्ष ठेवून आहे. चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मूल परिक्षेत्र नॉन बफर म्हणून ओळखला जातो. या परिक्षेत्रात पाहिजे त्या प्रमाणात जंगल नसल्याने गावात ंिहंस्र प्राण्यांची भीती नव्हती. मात्र गेल्या काही महिन्यात वाघाची दहशत वाढली असल्याचे दिसून येते.

Field operations under the supervision of forest officials | वन अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शेतीची कामे

वन अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शेतीची कामे

googlenewsNext
ठळक मुद्देवाघाची दहशत कायम : शिवारातील झुडुपे जेसीबीने नष्ट

राजू गेडाम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : दिवसेंदिवस वाघाच्या हल्ल्याबाबतच्या घटनेत वाढ होत आहे. जंगल नसलेल्या ठिकाणी जिथे आजपर्यंत शेतीची कामे अतिशय आनंदी वातावरणात केले जायची, तिथे आज भीतीचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे. मूल बिटात दोन इसमांना काही दिवसापूर्वी वाघाने ठार केल्याने वाघाची दहशत कायम असून शेतातील धानाची बांधणी व चुरणे चक्क वनविभागाच्या देखरेखीखाली होत आहे.
यासाठी शेती परिसरात सफाई करण्यात आली असून कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी वनविभाग सातत्याने शिवाराकडे लक्ष ठेवून आहे. चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मूल परिक्षेत्र नॉन बफर म्हणून ओळखला जातो. या परिक्षेत्रात पाहिजे त्या प्रमाणात जंगल नसल्याने गावात ंिहंस्र प्राण्यांची भीती नव्हती. मात्र गेल्या काही महिन्यात वाघाची दहशत वाढली असल्याचे दिसून येते. गेल्या सहा महिन्यात ४८ जनावरे व दोन इसमांना ठार केल्याची घटना घडली असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संतोष विठ्ठल गुरुनुले (६०) रा.कवळपेठ व शंकर किसन दुधबळे (६०) रा. चिचाळा अशी मृत पावलेल्या इसमांची नावे आहेत. चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मूल परिक्षेत्र हे नॉन बफर म्हणून ओळखले जाते. कक्ष क्रमांक ७५१ मध्ये हा प्रकार घडल्याने या परिक्षेत्रात वाघाची आजही दहशत आहे. या परिक्षेत्रात जंगल नसल्याने वाघाचे अस्तित्व आहे किंवा नाही, या बाबतची सांशकता निर्माण झाली होती. मात्र मागील सहा महिन्यात घडलेल्या घटनांमुळे येथे वाघाचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. गावकरी दहशतीत असून खरीप हंगामातील पिके हातात येण्याची ही वेळ आहे. त्यामुळे वनविभाग सतर्क होऊन प्रत्येक शेतकºयाच्या कामावर लक्ष ठेवून आहे.

शेताजवळील परिसराची जेसीबीने सफाई
यासाठी वनविभागाचे विभागीय वनअधिकारी सोनकुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने शेताजवळील परिसर जेसीबी सहाय्याने मोकळे केले आहे. सोलर बल्बची व्यवस्था करण्यात आली असून शेती परिसरात फिनीशिंग जाळीचे संरक्षण कुंपण करण्यात आले आहे. त्याला हलकासा सोलरच्या साहाय्याने विघुत पुरवठा करण्यात आला आहे. सदर विघुत प्रवाहाने फक्त झटका लागतो. त्यामुळे प्राण्यांचे काहीही नुसकान होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
व्याघ्र संरक्षण दलाचा पहारा
शेतात कापणी, बांधणी व चुरण्याचे काम सुरू असल्याने कुठलाही धोका निर्माण होऊ नये यासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दल, वनविभागाचे कर्मचारी व गावातील नागरिकांच्या सहकार्याने बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात कुठलीही घटना न घडता नियंत्रणाखाली असल्याचे दिसून येते. मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे काळाची गरज वाटू लागली आहे.

चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मूल बिटात कक्ष क्रमांक ७५१ मध्ये वाघाचे वास्तव्य असून शेतीची कामे करीत असताना विशेष लक्ष घालण्यात येत आहे. सोलर बल्ब, टॅप कॅमेरे, सोलर कंरट आदीची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दल, वनविभागाचे कर्मचारी व नागरिकांच्या सहकार्याने परिसर नियंत्रणात आणले आहे.
- पी. जी. खनके,
क्षेत्र सहायक मूल.

Web Title: Field operations under the supervision of forest officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.