शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

By admin | Updated: March 14, 2016 01:00 IST

चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस (ग्रामीण) च्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात अविस्मरणीय योगदान

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस (ग्रामीण) च्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात अविस्मरणीय योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार कार्यक्रम परशुराम भवन येथे बुधवारी पार पडला.प्रास्ताविकातून जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके म्हणाल्या, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील कारखान्यात १८ ते २० तास काम करणाऱ्या महिलांना पुरुषाबरोबरीचे वेतन मिळत नसल्यामुळे हक्काच्या न्याय मागण्यासाठी कारखान्याच्या मालकाविरोधात त्यांनी संघर्ष केला. म्हणून आज आपल्याला आठ तास कामाचा दिवस मिळत आहे. आज आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत. महिलांवरील वाढते अत्याचार, महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे अन्याय थांबविण्यासाठी महिलांनी संघटीत होऊन संघर्ष करण्याची गरज आहे, असे सांगितले.प्रमुख वक्ता अ‍ॅड. जयश्री इंगळे यांनी महिलाविषयक कायदे या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वरराव टेमुर्डे होते. ते म्हणाले, शरद पवार यांनी महिलांना ५० टक्के आरक्षण मिळवून दिले. हे आरक्षण सहजासहजी मिळाले नसून त्यांना सुद्धा अनेक परिश्रम घ्यावे लागले. महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने राजकीय क्षेत्रात दिलेल्या आरक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. हिराचंद बोरकुटे, शोभा पोटदुखे, किसान सभा अध्यक्ष सुरेश रामगुंडे, डी. के. आरीकर, माजी जिल्हाध्यक्षा हेमुता जानकर यांनी मार्गदर्शन केले. संचालन सीमा हनवते यांनी केले तर आभार वंदना आवळे यांनी मानले. यावेळी छायाताई चटप, कविता रामटेके, सावित्री भगत, सिंधुताई मडावी, सुलोचना कर्णेवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष पूजा उईके, माया ठावरी, माधुरी पांडे, सरस्वती गावंडे, सुचित्रा बोरकर, शुभांगी टापरे, सुमित्रा वैद्य, मनीषा कडूकर व शेकडो महिलांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)