शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

नव्या कन्हाळगाव अभयारण्यात गुंजणार ‘त्या’ बछड्यांची डरकाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 05:00 IST

बहुचर्चित कन्हाळगाव अभयारण्य अखेर घोषित झाले. या अभयारण्याला घेऊन अनेकांची उत्सुकता शिगेला गेली होती. वन्यजीव आणि दुर्मिळ प्राण्यांचा येथे अधिवास आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या अभयारण्याला लागून तेलंगणाची सीमा आहे. त्यामुळे कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाल्याने आंतरराज्यीय पर्यटनाला मोठा वाव आहे. गोंडपिपरी तालुक्याला त्याचा लाभ होणार आहे.

ठळक मुद्देडोंगरगाव-सूकवाशी परिसरात वाघिणीसह चार बछड्यांचा वावर

  निलेश झाडे    लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : वाघांसाठी नंदनवन ठरणाºया कन्हाळगाव अभयारण्यात आता नव्याने भर पडणार आहे. डोंगरगाव-सुकवाशीत आढळून येणाºया ‘त्या’ चार बछडयांची डरकाळी येत्या काही दिवसात कन्हाळगाव अभयारण्यात गुंजणार आहे. विशेष म्हणजे, अभयारण्याचा क्षेत्रात दहापेक्षा अधिक वाघांचा आधीच वावर आहे. आंतरराज्यीय पर्यटनाला वाव असलेल्या कन्हाळगाव अभयारण्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.मध्य चांदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत येणाºया डोंगरगाव-सूकवाशी परिसरात वाघिणीसह चार बछडयांचा वावर असल्याचे आढळून आले आहे. परिसरातील शेतकºयांना, गुराख्यांना वाघिणीसह बछडयांचे दर्शन अनेकदा झाले आहे. वनविभागानेही याला दुजोरा दिला आहे. बाल्यावस्थेत असलेले हे चारही बछडे येत्या काही दिवसात मुक्तसंचार करणार आहेत. कन्हाळगाव अभयारण्यात धाबा परिसरातील बहुतांश वनक्षेत्राचा समावेश आहे. त्यामुळे या चारही वाघांची डरकाळी अभयारण्यात भविष्यात गुंजणार आहे. वाघांच्या बछडयांवर वनविभागाची नजर असून त्यांच्या सुरक्षेसाठी वनविभाग दक्ष आहे. त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. 

आंतरराज्यीय पर्यटनाला वावबहुचर्चित कन्हाळगाव अभयारण्य अखेर घोषित झाले. या अभयारण्याला घेऊन अनेकांची उत्सुकता शिगेला गेली होती. वन्यजीव आणि दुर्मिळ प्राण्यांचा येथे अधिवास आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या अभयारण्याला लागून तेलंगणाची सीमा आहे. त्यामुळे कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाल्याने आंतरराज्यीय पर्यटनाला मोठा वाव आहे. गोंडपिपरी तालुक्याला त्याचा लाभ होणार आहे.

दहा वाघ, २३ बिबट्यांची नोंदनव्यानेच जाहीर झालेल्या कन्हाळगाव अभयारण्यातील वाघाच्या आकडेवारीबाबत मतभिन्नता आहे. दहा वाघ, २३ बिबटयांचा आवास अभयारण्यातील वनक्षेत्रात असल्याची रितसर नोंद वनविभागाकडे आहे. मात्र यापेक्षा अधिक वाघ,बिबट वनक्षेत्रात असल्याचे बोलले जात आहे.या आकडेवारीत आता नव्याने भर पडणार आहे. 

टॅग्स :Tigerवाघ