शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एफडीसीएमचे वनाधिकारी बनले वनसंपदेचे भक्षक ?

By admin | Updated: March 14, 2016 00:57 IST

मध्य चांदा वनविकास महामंडळांतर्गत येणाऱ्या गोंडपिंपरी तालुक्यातील चार महत्त्वपूर्ण वनपरिक्षेत्रात मागील महिन्यापासून अवैध बांबूतोड प्रकरणाला ऊत आला आहे.

अतिरिक्त कमाईची लालसा : वरिष्ठांचा जाणीवपूर्वक कानाडोळागोंडपिपरी : मध्य चांदा वनविकास महामंडळांतर्गत येणाऱ्या गोंडपिंपरी तालुक्यातील चार महत्त्वपूर्ण वनपरिक्षेत्रात मागील महिन्यापासून अवैध बांबूतोड प्रकरणाला ऊत आला आहे. एफडीसीएमच्याच वनाधिकाऱ्यांनी वनसंपदेचे नुकसान केल्याची सर्वत्र बोंब सुरू असताना वरिष्ठ मात्र या सर्व प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याचे दिसून येते. त्यामुळे एफडीसीएमचे वनाधिकारीच बनले वनसंपदेचे भक्षक, अशी चर्चा गावकऱ्यांत सुरू आहे.मागील महिन्यापासून एफडीसीएमच्या कन्हाळगाव, झरण, तोहोगाव, धाबा या चारही वनपरिक्षेत्रामध्ये तेजीने बांबू कटाईचे काम सुरू आहे. या कामासाठी चारही वनक्षेत्रात परप्रांतीय मजुरांचा वापर करून स्थानिकांना डावलण्यात आले. तसेच परराज्यातून आलेल्या कामगारांना तोकडे व अनियमित वेतन देण्याचा प्रकारही याच दरम्यान घडला आहे. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळही ओढावली होती. वनपरिक्षेत्रांतर्गत एफडीसीएम विभागाकडून परवानगी नसलेल्या कक्षांमध्ये बांबू कटाईचे काम करण्यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दाखविलेला अतिउत्साहीपणा हा केवळ अधिक माया कमविण्याचा आकस आहे. मात्र वरिष्ठ या गंभीर बाबीकडे कानाडोळा करीत असून अद्यापही कुठलीही कारवाई करण्याकरीता पुढे पावले उचलली नाही. त्यामुळे वनविकास महामंडळाच्या या ‘मिलीभगत’ प्रकाराची तालुक्यात सर्वत्र चर्चा रंगत आहे. निसर्गाची अनमोल देण असलेल्या वनसंपदेचे रक्षकच आता भक्षक म्हणून पुढे येऊ लागल्याने तालुक्यात चाललेल्या या प्रकारावर गांभीर्याने लक्ष देणार तरी कोण, असा सवाल येथील नागरिकांकडून विचारल्या जात आहे. वनसंपदेने चौफेर नटलेल्या गोंडपिंपरी तालुक्यात आजवर घडलेल्या घटनांमध्ये वनक्षेत्राला आग लागून लाखोंचे नुकसान, वन्यप्राण्यांची कत्तल, वाघ मृत्यू प्रकरणे, लाकडांची तस्करी अशा घटनांमध्ये एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांनी कधीही हिरीरी दाखविली नाही, अशी चर्चा सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)