शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी रोवण्या खोळंबल्याने शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

तालुक्याचे एकूण लागवड क्षेत्र ४६ हजार ३९४. ९८ हेक्टर आहे. यापैकी २६ हजार २९९. १४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. यात धानाचे पीक सर्वाधिक २२ हजार ७८८ हेक्टर,कापूस एक हजार ३२४ हेक्टर, सोयाबीन ६.९० हेक्टर, भाजीपाला ५१.४० हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहे. यावर्षी आतापर्यंत ३८२. ६ मिमि पाऊस पडला. त्यामुळे सिंचन व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांना पावसाची वाट बघावी लागत आहे.

ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा : ३८२. ६ मिमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यात रोवणी करण्यासाठी पुरेसे पाऊस न पडल्याने शेकडो शेतकऱ्यांची कामे ठप्प झाली आहेत. दमदार पाऊस पडला नाही तर रोवण्या पूर्ण होण्यास विलंब लागणार आहे.तालुक्याचे एकूण लागवड क्षेत्र ४६ हजार ३९४. ९८ हेक्टर आहे. यापैकी २६ हजार २९९. १४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. यात धानाचे पीक सर्वाधिक २२ हजार ७८८ हेक्टर,कापूस एक हजार ३२४ हेक्टर, सोयाबीन ६.९० हेक्टर, भाजीपाला ५१.४० हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहे. यावर्षी आतापर्यंत ३८२. ६ मिमि पाऊस पडला. त्यामुळे सिंचन व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांना पावसाची वाट बघावी लागत आहे. यावर्षी कापूस लागवडीत वाढ झाली. कापूस व सोयाबीन पीक सध्या चांगले आहे. भाजीपाला लागवडीकडे शेतकºयांचा कल वाढला. भाजीपाला हे नगदी पीक असल्याने शेतकरी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात लागवड करीत आहेत. यंदा समाधानकारक पाऊस आल्यास भात पिकासह कापूस, सोयाबीन, भाजीपाल्याचे उत्पादन चांगले होण्याची आशा आहे. मात्र, सध्या तरी शेतकरी चिंतेत आहेत.पावसाला सुरुवात झाली. मात्र, रोवणीसाठी पुरेसे पाऊस आला नाही. निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी रोवणीला सुरूवात केली नाही. कृषिपंप व सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी रोवणी करीत आहेत. कृषी पथक शेतकऱ्यांच्या बांध्यावर जावून पाहणी करीत आहे. पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव नये, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.- प्रशांत कचराळे, तालुका कृषी अधिकारी, मूल

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती