शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कृषी विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

By admin | Updated: July 24, 2014 23:47 IST

राष्ट्रीय कृषी विमा योजनाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी केले आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी करून घ्या,

विभागांना पाठविले पत्र : आशुतोष सलिल यांच्या सूचनाचंद्रपूर : राष्ट्रीय कृषी विमा योजनाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी केले आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी करून घ्या, अशा आशयाचे पत्र त्यांनी सर्व पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना पाठविले आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यातील अधिसूचीत मंडळातील अधिसूचीत पिकांसाठी राष्ट्रीय कृषि विमा योजना खरिप २०१४ हंगामात राबविण्यात येत असून एकुण कमाल विमा संरक्षित रक्कम सरासरी उत्पन्नाच्या १५० टक्यापर्यंत घेण्याची तरतुद मंजुर करण्यात आलेली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या जवळपास सर्वच पिकांचा यात समावेश असून शेतकऱ्यांनी बँकेकडे प्रस्ताव सादर करण्याची व विमा हप्ता रक्कम भरण्याची अंतिम मुदत पिक पेरणीपासून एक महिना किंवा ३१ जुलै २०१४ (उस पिका व्यतिरिक्त) यापैकी जे आधी असेल ते राहील. या योजनेत अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना विमा हप्ताची ९० टक्के रक्कम तर इतर शेतकऱ्यांनी विमा हप्ताची १०० टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे.सदर योजनेत समाविष्ट पिके, जोखीम स्तर, प्रती हेक्टर विमा संरक्षित रक्कम व भरावयाच्या विमा हप्त्याचा दर तसेच इतर सूचना ५ जुलै रोजीच्या शासन निर्णयात निदेशित केल्या असून त्याची प्रत प्रत्येक गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.सदर सुधारित योजनेस व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी करून आपल्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यात यावी. याकरिता गट विकास अधिकारी यांनी सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, अधिकारी व कर्मचारी यांच्याशी समन्वय साधून आपल्या क्षेत्रातील सर्व कार्यालये, ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालय, शेतकरी गट, सेवाभावी संस्था आदींनी याबाबत अवगत करावे. योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी, अशा सूचना पत्रात देण्यात आल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)