शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी अधिकृत बियाण्यांची पेरणी करावी

By admin | Updated: June 15, 2017 00:32 IST

शेतकऱ्यांनी अधिकृत बियाणांचीच खरेदी करून पेरणी करावी.

देवराव भोंगळे : अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देशलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांनी अधिकृत बियाणांचीच खरेदी करून पेरणी करावी. अनेक शेतकरी अनधिकृत चोर बीटी बियाणे वापरत असून अनधिकृत बियाण्यांमुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकसान झाल्यास शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यास ते शेतकरी अपात्र राहतील. त्यामुळे अधिकृतच बियाणे वापरून पेरणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या समिती कक्षात मंगळवारी आयोजित खरीप हंगाम संदर्भात कृषी निविष्ठा (बियाणे व रासायनीक खते) व गुणनियंत्रण विषयक आढावा सभेमध्ये बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, कृषी, पशुसंवर्धन मत्सव्यवसाय समिती सभापती अर्चनाताई जिवतोडे, वरोराच्या पं. स. सभापती रोहीणी देवतळे, जि. प. सदस्य आसुटकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हसनाबादे, कृषी विकास अधिकारी लोहोट, सर्व तालुका कृषी अधिकारी व अर्धवेळ गुणनियंत्रक उपस्थित होते. ज्या शेतकऱ्यांकडे किंवा दुकानदाराकडे अनधिकृत बियाणे सापडतील, त्यांच्यावर कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. शेतकऱ्यांनी अधिकृत बियाणेच वापरावे, याकरिता कृषी विभागाकडून प्रचार प्रसिध्दी करावी व उपाययोजना करुन अहवाल सादर करण्याच्या सूचनाही भोंगळे यांनी केल्या. यावेळी प्रत्येक पंचायत समीतीचा आढावा घेऊन चर्चा करण्यात आली. संचालन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हसनाबादे तर आभार लोहोट यांनी मानले.