शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी धरली तेलंगणाची वाट

By admin | Updated: November 7, 2015 00:47 IST

दिवाळी सण तोंडावर आला असताना शेतकऱ्यांजवळ एक सदामही पैसा शिल्लक नाही.

प्रकाश काळे गोवरीदिवाळी सण तोंडावर आला असताना शेतकऱ्यांजवळ एक सदामही पैसा शिल्लक नाही. हाती असलेला सर्व पैसा खर्च झाल्याने शेतकऱ्यांचा खिसा रिकामा झाला आहे. कापूस वेचणाऱ्या मजुरांचे पैसे व इतर खर्च कसा करायचा, या विवंचनेत शेतकरी असताना खासगी व्यापाऱ्यांकडून पांढऱ्या सोन्याची अक्षरश: लूट केली जात आहे. मात्र परिस्थितीचा गुलाम झालेल्या शेतकऱ्यांना मनात इच्छा नसतांनाही कवडीमोल भावात कापूस विकावा लागत असून कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आता तेलंगणाची वाट धरली आहे.शासनाने पणन महासंघाच्या कापूस खरेदीचा शुभारंभ ५ नोव्हेंबरला करण्यात आला. चार हजार १०० रुपये हमी भावाने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात येत आहे. अगदी दिवाळीच्या तोंडावर शासनाने पणन महासंघातर्फे ही कापूस खरेदी सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी धावपळ सुरू झाली आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश सरकारी कापूस संकलन केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांना कापूस कवडीमोल भवात खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ असणे अपेक्षित होते. कापसाची बाजारपेठ व्हावी ही शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र कापूस पिकवूनही तो शेतकऱ्यांना परप्रांतात नेऊन विकावा लागत आहे. दिवाळी अगदी तोंडावर आली असताना पणती लावायलाही शेतकऱ्यांजवळ पैसे उरले नाही. महागाईचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढत चालला. त्या तुलनेत शेतकऱ्यांच्या कापसाचे भाव वाढणे आवश्यक होते. यावर्षी कापसाचे दर वाढेल, अशी आस शेतकऱ्यांना होती. मात्र कापूस दरवाढीत कोणताही बदल झाला नाही. उलट कापसाची आवक पाहूण खासगी व्यापारी कापसाचे भाव पाडत आहे.तेलंगणा राज्यातील आदिलाबाद शहरात कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आदिलाबाद, बेला व यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील खासगी कापूस बाजारपेठेला शेतकऱ्यांनी अधिक पसंती दिल्याने याचा पुरेपूर फायदा खासगी व्यापारी घेत आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर कापसाची आवक वाढल्याने खासगी व्यापाऱ्यांनी तीन हजार ७०० ते तीन हजार ८०० रुपयांपर्यंत कापसाचे भाव पाडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. दररोज शेकडोहून अधिक मेटॅडोरने कापूस परप्रांतात विक्रीसाठी जात आहे. हा सारा आर्थिक ताण शेतकऱ्यांना परवडणारा नाही. मात्र हातावर आणून पानावर खाणाऱ्या कापूस वेचणी मजुरांना पैसे द्यायचे कुठून, इतर खर्च कसा करायचा, या विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना मनात इच्छा नसतानाही कापूस कवडीमोल भावात विकावा लागत आहे.शासनाच्या सरकारी कापूस संकलन केंद्राचा श्रीगणेशाच झाला नाही. त्यामुळे याचा सर्व फायदा खासगी कापूस व्यापाऱ्यांनी उचलला आहे. शेतकऱ्यांना कापूस विकावाच लागतो, ही खासगी व्यापाऱ्यांची पक्की धारणा झाली आहे. शासनाची शेतकऱ्यांना साथ नसल्याने व्यापाऱ्यांनी मनमानी सुरू केली केली आहे. शेतकऱ्यांची होत असलेली फरफट जबाबदार लोकप्रतिनिधींना का दिसत नाही, असा अनेकांना पडणारा प्रश्न काळजात घर करणारा आहे. मात्र शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.