शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनामुळे शेतकरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 05:00 IST

भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राच्या माहितीनुसार, जून महिन्यात विविध भागात पाऊस बरसणार आहे.  शिवाय यंदाचा मान्सून सरासरीच्या १०१ टक्के असेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला. दरम्यान पुणे वेधशाळेनेही विदर्भात पुढचे  चार दिवस मान्सूनपूर्व पावसाचे असल्याची शक्यता वर्तविली आहे.  यामुळे शेतकºयांनी शेतमालाची काळजी घ्यावी अशाही सूचना दिल्या आहेत. 

ठळक मुद्देहवामान स्थिती पोषक : चार लाख ८२ हजार ८८ हेक्टरवर लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केरळमध्ये गुरुवारी मान्सूनचे आगमन झाले. त्यामुळे राज्यात येत्या चार-पाच दिवसात आगमनाचे संकेत मिळत आहेत. दरम्यान शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी दिली.  मोसमी वाऱ्यांची वाटचाल अशीच कायम राहिल्यास मान्सूनचा पाऊस जिल्ह्यातील कृषी व्यवस्थेला नवीन संजीवनी देऊ शकतो. यंदा चार लाख ८२ हजार ८८ हेक्टरवर होणार खरीप लागवडीचे नियोजन  करण्यात आले आहे.भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राच्या माहितीनुसार, जून महिन्यात विविध भागात पाऊस बरसणार आहे. शिवाय यंदाचा मान्सून सरासरीच्या १०१ टक्के असेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला. दरम्यान पुणे वेधशाळेनेही विदर्भात पुढचे  चार दिवस मान्सूनपूर्व पावसाचे असल्याची शक्यता वर्तविली आहे.  यामुळे शेतकºयांनी शेतमालाची काळजी घ्यावी अशाही सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात चार दिवसांपासून दररोज सायंकाळी  ढगाळ वातावरण तयार होत आहे. रात्रीचे तापमानही आता कमालीचे खाली घसरले. शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी दिली. शेतकरी आता पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला. मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाने उकाडाही कमी झाला आहे. 

बियाण्यांबाबत व्हॉट्‌स अ‍ॅपवर करता येणार तक्रारखरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मान्सूनचे आगमन झाल्यास कृषी निविष्ठा खरेदीसाठी बाजारात वर्दळ वाढेल. अशावेळी विक्रेते शेतकऱ्यांकडून जादा रकम वसूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कृषी आयुक्तांच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना तक्रारी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. कृषी निविष्ठांसाठी जादा रक्कम घेतल्यास शेतकऱ्यांनी व्हॉट्‌स अ‍ॅपवर व कृषी विभागाच्या ई-मेलवर पुराव्यांसह तक्रारी करता येणार आहेत.

बीटी कपाशीची नऊ लाख ८६ हजार पाकिटेजिल्ह्यात यंदा कापूस व सोयाबीन लागवड क्षेत्र वाढणार आहे. यासाठी कृषी विभागाने बीटी कपाशीच्या नऊ लाख ८६ हजार पाकिटांची मागणी कृषी संचालकांकडे नोंदविली आहे.याशिवाय भात २ हजार ८०० क्विंटल, तूर २ हजार ८०० क्विंटल, सोयाबीन ३१ हजार ४४३ क्विंटल बियाणे जिल्ह्यासाठी मागविण्यात आले. मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने शेतकरी पेरणीपूर्व कामांसाठी लगबग करीत असल्याचे दिसून येत आहे

बियाणे बाजारपेठ संशयाच्या भोवऱ्यात

बियाणे कायदा १९६६ अनुसार, कोणतेही बियाणे विकताना शेतकऱ्यांकडून हमीपत्र भरून घेण्यास मनाई आहे. मात्र काही विक्रेते अशा प्रकारचे हमीपत्र भरून घेण्यास शेतकऱ्यांना तगादा लावत असल्याची माहिती. ७० टक्क्यांपेक्षा कमी उगवण क्षमता असणारे बियाणे विकता येत नाही. जादा नफा मिळविण्याच्या हव्यासात विक्रेते काही कंपन्यांकडून बियाणे खरेदी करतात. शेतकऱ्यांना हे बियाणे विकताना हमीपत्र भरून घेण्याचा आग्रह करीत आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी तक्रार केली नाही. पण, विशेषत: सोयाबीन बियाणे बाजारपेठ संशयाच्या भोवऱ्यात आहे. कृषी विभागाने विक्रेत्यांची चौकशी करून कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आता शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. यावर्षी बियाण्यांची टंचाईदेखील होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती