शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी खासगी सावकाराच्या दारात

By admin | Updated: December 2, 2015 00:45 IST

शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असल्या तरी या योजनेतील अनुदान मिळण्यास कमालिचा विलंब होत असल्याने ..

अधिकाऱ्यांचा गलथान कारभार : योजनेचे अनुदान मिळण्यास विलंबशंकर चव्हाण/ संघरक्षित तावाडे जिवतीशेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असल्या तरी या योजनेतील अनुदान मिळण्यास कमालिचा विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना कर्जासाठी नाईलाजाने खासगी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. कर्ज घेऊन शेतकरी योजनेतील काम पूर्ण करतात. मात्र वर्षानुवर्षे सबंधित शेतकऱ्याला अनुदान मिळविण्यासाठी पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागत आहे. जीवती तालुक्यातील हे वास्तव शेतकऱ्यांना संकटाच्या खाईत ढकलणारे आहे. जिवतीवरुन १२ किमी अंतरावरील टेकामांडवा येथील शेतकरी बळीराम रामा गोरे याला रोजगार हमी योजनांतर्गत विहीर बांधण्यासाठी तीन लाख मंजूर झाले. त्यानुसार २०१४-१५ साली बळीराम गोरे याने शासनाकडून लवकरच अनुदान मिळेल या आशेपोटी खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन शेतात विहीरीचे बांधकाम पूर्ण केले. मात्र विहीरीचे काम पूर्ण होऊन सहा महिन्याचा कालावधी लोटला. परंतु आतापर्यंत त्याला केवळ ८० हजार रुपयांचा एकच हप्ता मिळाला आहे. विहिरीचे बांधकाम पूर्ण झाल्याचे अभियंत्याकडून मुल्यमापन (एम.बी.) सुद्धा करण्यात आले. पण कामाचे विल मात्र अजूनपर्यंत मिळालेले नाही. बिल मिळावे यासाठी बळीराम गोरे जीवती पंचायत समितीच्या वारंवार येतो. परंतु येथील अधिकारी व कर्मचारी उडवाउडवीचे उत्तर देऊन त्याला परत पाठवित आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देण्याचा शासनाचा मानस आहे. शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर योजना पोहचवा, असे शासनाचे अधिकाऱ्यांना निर्देश असताना अधिकाऱ्यांकडून मात्र शासनाच्या निर्देशाचे पालन केले जात नसल्याचे दिसून येते. तालुक्यात केवळ एकाच शेतकऱ्यांची अशी अवस्था नाही अनेक शेतकऱ्यांना योजनेच्या अनुदानापासून मुकावे लागत आहे. शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.