धान विक्रीसाठी शेतकऱ्याची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 06:00 AM2020-03-13T06:00:00+5:302020-03-13T06:00:39+5:30

खरेदी करणाऱ्या कार्यालयात फक्त खरेदीचा फलकच लावला आहे. विशेष म्हणजे, सदर कार्यालय रोजच बंद असते. त्यामुळे शेतकऱ्यांना गेल्या पावली परत यावे लागत आहे. काही शेतकरी हे ज्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत, ते केंद्रप्रमुख सुरेश भसारकर यांना भ्रमणध्वनीवरून व प्रत्यक्ष भेट घेऊन विचारणा केली असता गोदाम भरून आह.े त्यामुळे धान खरेदी करू शकत नाही, असे उडवाउडवीचे उतर देत आहेत.

Farmer's Pipette for Sale of Paddy | धान विक्रीसाठी शेतकऱ्याची पायपीट

धान विक्रीसाठी शेतकऱ्याची पायपीट

Next
ठळक मुद्देआदिवासी विकास महामंडळाला निवेदन : धान खरेदी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
आक्सापूर : गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत मागील दोन महिन्यांपासून धान खरेदी सुरु आहे. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांचे धान घेण्यात आले व उर्वरित शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यासाठी पायपीट सुरु असून धान खरेदी तत्काळ करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
या संदर्भातील निवेदन आदिवासी विकास महामंडळ उपविभाग गोंडपिपरी व व्यवस्थापक सहकारी संस्था करंजी यांना देण्यात आले आहे. राज्य सरकारने धानाला १८१५ रुपये हमीभाव जाहीर केला व बोनस ७०० रुपये केला. मात्र या तुलनेत अन्य ठिकाणी धानाचे भाव कमी असल्याने करंजी आदिवासी विविध सहकारी संस्थेमार्फत धान खरेदी सुरु असल्याने या संस्थे अंतर्गत येत असलेले करंजी, आक्सापूर, जोगापूर, धानापुर, गणपूर, कन्हाळगाव या गावातील शेतकरी रोजच करंजी येथे जाऊन धान विक्रीसाठी विचारणा करण्याकरिता जात आहेत. मात्र खरेदी करणाऱ्या कार्यालयात फक्त खरेदीचा फलकच लावला आहे. विशेष म्हणजे, सदर कार्यालय रोजच बंद असते. त्यामुळे शेतकऱ्यांना गेल्या पावली परत यावे लागत आहे. काही शेतकरी हे ज्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत, ते केंद्रप्रमुख सुरेश भसारकर यांना भ्रमणध्वनीवरून व प्रत्यक्ष भेट घेऊन विचारणा केली असता गोदाम भरून आह.े त्यामुळे धान खरेदी करू शकत नाही, असे उडवाउडवीचे उतर देत आहेत. परंतु वास्तविकता बघितल्यास करंजी संस्थे मार्फत येणाऱ्या गावात फक्त मोजक्याच लोकांचे धान खरेदी केल्याने गोदाम भरलाच कसा व या परिसरात बारीक धान पिकत असल्याने जाड धान आले कुठून, असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून जाड धान खरेदी करून रातोरात गोदाम भरल्याचा आरोप शेतकरी करीत असून तसा आरोपसुद्धा आदिवासी विकास महामंडळ उपविभाग गोंडपिपरी व व्यवस्थापक आदिवासी विविध सहकारी संस्था करंजी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

करंजी संस्थेसह माझ्याकडे चार सहकारी संस्थेचा प्रभार आहे. त्यामुळे करंजी आदिवासी सहकारी संस्थेचे लिपिक सुरेश भसारकर यांना केंद्रप्रमुख म्हणून धान खरेदी करण्याचे अधिकार देण्यात आले. धान खरेदी करत नसल्याची माझ्याकडे शेतकºयांची तक्रार प्राप्त झाली असून पुढील कारवाई सुरू असून धान खरेदी लवकरच सुरू करण्यात येईल.
- विश्वनाथ आलाम, व्यवस्थापक, आदिवासी विविध कार्य, सहकारी संस्था, करंजी.

Web Title: Farmer's Pipette for Sale of Paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.