शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे आता उद्ध्व‌स्त झालेल्या पिकाच्या विम्याकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 05:00 IST

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर विविध रोगांनी तालुक्यातील धान पीक पुरते नेस्तनाबूत ...

ठळक मुद्देशेतकरी धास्तावले : धान पिकांना जबर फटका

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर विविध रोगांनी तालुक्यातील धान पीक पुरते नेस्तनाबूत झाले आहे. धास्तावलेले तालुक्यातील शेतकरी आता पीक विम्याकडे आस लावून बसले आहेत. आता विमा कंपनी शेतकऱ्यांच्या मदतीला कितपत धावून येते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.नागभीड तालुक्यात धानाचे एकमेव पीक घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापैकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात हे पीक घेण्यात येते. आर्थिकदृष्टया सक्षम नसल्याने हे पीक घेण्यासाठी शेतकरी गावातील सेवा सहकारी आणि आदिवासी विविध कार्यकारी या सोसायटयांमार्फत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्जाची उचल करीत असतात. शेतकरी हे कर्ज उचलत असतांना कर्जाऊ रकमेतून जिल्हा मध्यवर्ती बँक पिक विम्याचा हप्ता कपात करून विमा कंपनीकडे हप्त्याची रक्कम जमा करीत असते. अशीच पद्धत इतर राष्ट्रीयकृत बँकाही अवलंबत असतात. जिल्हा मध्यवर्ती बँकेचाच विचार करता ही बँक दरवर्षी सहा ते सात हजार शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध करून देत असल्याची माहिती आहे. काही शेतकरी वैयक्तिकरित्याही आपल्या शेतीचा पीक विमा काढत असतात.असेही शेतकरी शेकडोच्या घरात आहेत.यावर्षी नागभीड तालुक्यात धानावर अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर मावा, तुडतुडा, करपा यासारख्या विविध रोगांनी धान पीक पार नेस्तनाबूत केले. आता मळणीनंतर दर एकरी पाचसहा पोती उत्पन्न शेतकºयांच्या हातात येत असून या उत्पन्नाने शेतकरी पार हादरून गेले आहेत.हे शेतकरी आता पीक विम्याची मागणी करू लागले आहेत. दरम्यान नागभीड येथील काही शेतकºयांनी पीक विमा कंपनीच्या अधिका?्यांशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला पण हे अधिकारी कोणतीच दाद देत नसल्याचे सुधाकर अमृतकर या शेतकºयाने सांगितले.कृषी विभागाकडून नुकसानीचे सर्वेक्षणतालुक्यातील एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन शासनाच्या महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागात कार्यरत असलेल्या तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक हे गावागावात नुकसानीचे तक्ते तयार करीत असल्याची माहिती संबंधित विभागाच्या एका अधिकाºयांनी दिली. तक्ते तयार करण्याचे हे काम जवळपास ७५ टक्के झाले असल्याचीही माहिती आहे. तक्ते पाडण्याचे हे काम पूर्ण झाले की तक्तयांचा गोषवारा संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.२०१७ मध्ये मिळाली होती मदत२०१७ च्या हंगामात असेच धान पीक विविध रोगांनी नेस्तनाबूत केले होते. त्यावेळी अनेक शेतकºयांनी शेतातच उभे धानपीक जाळले होते. माध्यमांनी शेतकºयांच्या व्यथा उजागर केल्यानंतर शासनाने मदत आणि विमा कंपनीही शेतकºयांच्या मदतीला धावून आल्या होत्या.