शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कामाच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक

By admin | Updated: July 6, 2014 23:50 IST

विद्युत वाहक टॉवर उभारण्याचे काम तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुरू आहे. संबंधित शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नाहरकत प्रमाणपत्र किंवा अनुमती न घेता शासकीय काम असल्याचे सांगून

ब्रह्मपुरी : विद्युत वाहक टॉवर उभारण्याचे काम तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुरू आहे. संबंधित शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नाहरकत प्रमाणपत्र किंवा अनुमती न घेता शासकीय काम असल्याचे सांगून कोणताही मोबदला न देता त्यांच्या शेतात बळजबरीने काम करण्यात येत आहे. यात वीज कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे.वर्धा ते गोंदियापर्यंत जाणाऱ्या विद्युत वाहक टॉवरचे काम ब्रह्मपुरी तालुक्यात उन्हाळ्यापासून सुरू करण्यात आले आहे. सदर टॉवरकरिता अर्धा एकर जागेची आवश्यकता आहे. ज्या-ज्या शेतात टॉवर उभारण्यात आले किंवा उभारण्यात येत आहे, त्या शेतकऱ्याची अर्धा एकर शेती नेहमीकरिता विद्युत वाहक टॉवर खाली येणार आहे. तेवढ्या जमिनीत उत्पन्न नेहमीकरिता बंद होणार आहे. सदर विद्युत वाहक टॉवर उभे करण्याआधी पॉवर ग्रिड कारपोर्रेशन आॅफ इंडिया लिमिटेड या नावाने शेतमालकांना डिसेंबर २०१३ मध्ये नोटीस देण्यात आली होती. सदर नोटीसही शिक्क्याशिवाय देण्यात आली होती. त्याच नोटीसच्या प्रतिलीपी तहसीलदार तथा एक्जिक्युटीव्ह मॅजिस्ट्रेट यांना देण्यात आल्याचे सदर नोटीसच्या खाली दर्शविण्यात आले होते. ब्रह्मपुरी तालुक्यातील दिघोरी, नान्होरी, तोरगाव (बु.), नांदगाव (जाणी), अऱ्हेर- नवरगाव, पिंपळगाव, सौंद्री, सावलगाव इत्यादी गावातील शेतामधून विद्युत वाहक टॉवरचे काम सुरु करण्यात आले. सदर विद्युत वाहक टॉवरमधून ७६५ केव्ही हायटेशन विद्युत जाणार असल्याने टॉवरच्या परिसरात कोणतेही बांधकाम करता येत नाही. तसेच टॉवर खालील जागेतील उत्पन्न नेहमीकरिता बंद होणार असतानाही कंपनीकडून शेतकऱ्यांना कोणताही मोबदला देण्यात आला नाही. काही शेतकऱ्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अडविले असता काहींना पाच हजार, १० हजार तर कोणाला ४० हजारापर्यंत रक्कम देऊन बळजबरीने काम करण्यात आले. शासकीय काम असल्याचे सांगून सदर कंपनी व काही अधिकारी शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. सदर बाबीची तक्रार शासकीय अधिकाऱ्यांकडेही करण्यात आली. मात्र अजूनही शासकीय स्तरावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे पीडित शेतकऱ्यांनी सांगितले. सदर प्रकरणी चौकशी करुन योग्य मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. (प्रतिनिधी)