शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या विकासासाठी देशातील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोगाचा अवलंब करावा

By admin | Updated: June 10, 2015 01:43 IST

इस्त्राईलसारख्या देशात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाल्यानेच शेती व्यवसायात क्रांती झाली.

कान्हाळगाव (कोरपना) : इस्त्राईलसारख्या देशात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाल्यानेच शेती व्यवसायात क्रांती झाली. एवढेच नाही तर त्यांनी वेळोवेळी येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले. या देशातील सामूहिक पद्धतीने शेती करण्याचे तंत्र हेच यशाचे सुत्र आहे. अशा नवनवीन प्रयोगांचा आपल्या देशातील शेतकऱ्यांनी अवलंब केल्यास आपली शेती पुन्हा नक्कीच अधिक प्रगत होईल, असे मत केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले. ते कोरपना येथे कृषी जीवन विकास प्रतिष्ठान, येनबोडी व स्कॉलर्स सर्च अकॅडेमी कोरपनाद्वारा रविवारी आयोजित आधुनिक शेतीवर कार्यशाळेप्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कृषी जीवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड.बाबासाहेब वासाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय धोटे, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, कृषी कल्याणचे कार्यकारी संपादक नितीन कुलकर्णी, जेष्ठ शास्त्रज्ञ सी.डी.मई, डॉ.शरद पवार, प्रशांत वासाडे, रवी बोरकर, दुग्धतज्ज्ञ डॉ.सुनील सहातपुरे, अ‍ॅग्रोनामिस्ट यशोदीप गिरसे, संजय वासाडे, डॉ.बसवराज, अभियंता दिलीप झाडे, गोपाळराव सातपुते आदी उपस्थित होते. याप्रसंगी आ. संजय धोटे, अ‍ॅड.बाबासाहेब वासाडे, सी.डी.मई, यशोदीप गिरसे, प्रशांत वासाडे, डॉ.शरद पवार, डॉ.सुनील सहातपुरे, डॉ.बसवराज, नितीन कुलकर्णी यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रगतशिल शेतकरी अविनाश जाधव, किशोर बावणे, प्रभाकर गेडाम यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.अशोक राजूरकर, श्रीधर मालेकर, रमेश मालेकर, पद्माकर मोहीतकर, नारायण हिवरकर, कुंदा झाडे आदी उपस्थित होते. संचालन नितीन कुलकर्णी यांनी तर आभार दिलीप झाडे यांनी मानले. या कार्यशाळेला चंद्रपूर, यवतमाळ व तेलंगणातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (वार्ताहर)कोरपना परिसरात सूत गिरणी उभारणीला प्राधान्य देऊकोरपना हे कापूस उत्पादक प्रदेश आहे. या भागात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी शेतमालाची व कापसाची बाजारपेठ येथे आहे. या भागातील कापूस उत्पादक शेतीला चालना देण्यासाठी सुतगिरणी उभारणीला प्राधान्य देऊ असे मत अहीर यांनी व्यक्त केले.