शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या सरीने शेतकरी सुखावला

By admin | Updated: July 24, 2014 23:47 IST

तालुक्यातील सर्व परिसरात बऱ्याच प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावून शेतात पेरलेल्या बियानांच्या अंकुराना जीवदान मिळाले आहे. बऱ्याच कास्तकाराने जून महिन्यात पेरणी केली.

राजुरा : तालुक्यातील सर्व परिसरात बऱ्याच प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावून शेतात पेरलेल्या बियानांच्या अंकुराना जीवदान मिळाले आहे. बऱ्याच कास्तकाराने जून महिन्यात पेरणी केली. परंतु पावसाने दगा दिल्यामुळे पेरणी वाया गेली. शेतकरी आर्थिक व मानसिकरित्या हतबल झाला होता. अचानक पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला आहे.यंदा पावसाने शेतकऱ्यांना संकटात टाकले. पाऊस निसर्गाची देण आहे. त्यावर कोणाचे नियंत्रण नाही. तसेच आवश्यकता व मर्जीनुसार पाऊस पडणे अद्याप शक्य झाले नाही. असे असताना शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे महागडे बियाणे खरेदी करून जून महिन्यात पेरणी केली. परंतु पावसाने दगा दिला. जून महिना कोरडा गेला.वातावरणातील उष्णतेमुळे अंकुर वाळून गेले. शेतकरी ढगाकडे पाहून दुबार पेरणीची वाट पाहत होते. थोडा पाऊस पडताच दुबार पेरणी केली व येरे येरे पावसा तुला देतो पैसा करीत वरुणराजाला साकडे घालीत होते. नुकतेच ३-४ दिवसांपासून पावसाने हजेरी लावली व बियाणाच्या अंकुरांना जिवदान मिळाले आहे. सध्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.तरीपण दीड महिन्याचा कालावधी लोटल्यामुळे पिकावर त्याचा परिणाम होणार आहे. सध्या कापूस व सोयाबीनचे बियाणे उगवले आहे. त्याचा वाढ होण्यास बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची दाट शक्यता आहे.यावर्षी शेतकऱ्यांनी बँकेतून पिक कर्ज घेवून शेतात बियान्याची पेरणी केली. परंतु प्रथम केलेली पेरणी वाया गेली. बिकट परिस्थितीत दुबार पेरणी केली व पावसाने साथ दिल्यामुळे थोडेफार उत्पन्न घेण्याची आशा निर्माण झाली आहे. यावर्षी उत्पन्नात निश्चित घट होणार आहे. पंरतु शेतकऱ्यांना खर्च नेहमीप्रमाणे करावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट व खर्चाच्या मोबदल्यात पिकाचे उत्पन्न होण्याबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यास योग्य दर मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच त्यांची स्थिती सुधारू शकते. (तालुका प्रतिनिधी)