शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य योजनेतून कुटुंबातील सदस्यांची नावे गहाळ

By admin | Updated: September 13, 2014 01:13 IST

शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे...

भेजगाव : शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे आरोग्य पत्र प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत पात्र लाभार्थी कुटुंबापर्यंत वाटप करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर योजनेचे आरोग्यपत्र नागरिकांच्या हाती आले असले तरी, आरोग्यपत्रात अनेक सदस्यांची नावेच गहाळ झाली आहेत. त्यामुळे लाभार्थी संभ्रमात आहेत.आरोग्य योजना चांगली असली तरी कुटुंबातील काही सदस्यांची नावे नाही तर काहींची चुकीचे नाव असल्याने या योजनेपासून त्या सदस्यांंना लाभ घेता येणार नाही. परिणामत: शासनाची ही योजना फसवी ठरणार असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांमध्ये आहे. योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा दारिद्रयरेषेखालील पिवळे शिधापत्रीकाधारक, अंत्योदय व अन्नपूर्णा व दारिद्रय रेषेवरील केशरी शिधापत्रधारक यांचा योजनेत समावेश आहे.ग्रामीण भागात गरीबीचे प्रमाण जास्त असून महागाईच्या काळात सामान्य कुटुंब होरपळून निघत आहे. हातावर आणून पाणावर खाण्याची संख्या अधिक आहे. अशा कुटुंबाना आरोग्याची जटील समस्या भेडसावली की, कुटुंब फक्त मरण शोधतो. गरीबांच्या या समस्येवर जीवनदान देण्याच्या दृष्टीने शासनाने आरोग्य योजनेअंतर्गत आधार देण्याच्या संकल्पनेतून ही योजना कार्यान्वीत केली. मात्र, योजनेच्या सुरुवातीलाच आरोग्यपत्रात त्रृट्या असल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उभा आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही एक आरोग्य विमा योजना असून त्यात निवडक ९७१ गंभीर आजारावर व १७१ पाठपुरावा सेवांवर या योजने अंतर्गत रुग्णालयातून उपचार घेता येणार आहे. आरोग्य पत्रात गावातील बंडूजी लाकडे यांच्या कुटुंबात चार सदस्य असताना आरोग्यपत्रात फक्त कुटुंब प्रमुख बंडू लाकडे यांचेच नाव तर श्रीहरी गणविर यांच्या कुटुंबात तीन व्यक्ती असताना त्यांचे एकाचेच नाव असून भलत्याच व्यक्तीचे नाव आरोग्यपत्रात समाविष्ठ आहे. अशाप्रकारे अनेकांच्या आरोग्यपत्रात चुका आहेत. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्ष दीड लाख रुपये पर्यंत व मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अडिच लाख रुपया पर्यंत महाराष्ट्र शासनाने विमा हप्ता करुन निवडक आजारांसाठी रुग्णाला मान्यताप्राप्त रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहे. मात्र आरोग्यपत्रातच नावेच नसल्याने अनेकांना जीव धोक्यात घालून उपचारापासून वंचित राहावे लागणार आहे. प्रशासनाने आरोग्यपत्रात सुधारणा करुन नवीन आरोग्यपत्र देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)