शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

बनावट सोने विकणारी टोळी जेरबंद

By admin | Updated: March 12, 2016 01:13 IST

बनावट सोने विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

महिलेचा समावेश : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईचंद्रपूर : बनावट सोने विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. यापैकी दोघांना गुरूवारी सायंकाळी तर एका महिलेला शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली.गंगाराम मंगल सोलंकी (३२), प्रभू राजाराम गुजराती (३३) व जमनाबाई रणछोड सोलंकी (६५) अशी अटक करण्यात आलेल्या टोळीतील सदस्यांची नावे असून हे सर्वजण न्यू येरखेडा कामठी (जि.नागपूर) येथील रहिवासी आहेत. यासंदर्भात शुक्रवारी पोलीस उपअधीक्षक (गृह) जयेंद्र काटे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सुशिलकुमार नायक, रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात या घटनेसंदर्भात माहिती देण्यात आली.पोंभुर्णा येथील जनरल स्टोअर्सचा चालक दिनेश खोब्रागडे याच्याकडे ८ मार्चला एक इसम आला होता. मला खोदकाम करताना दीड किलोचा सोन्याचा हार सापडला. मी गरीब असून मुलीचे लग्न असल्याने मला तो विकायचा आहे. तुम्ही उद्या चंद्रपूरला या मी तुम्हाला सोन्याचा हार दाखवितो, असे त्याने दिनेशला सांगितले. दिनेश पूर्वी भद्रावती येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अनमोल कोल्हटकर यांच्याकडे नोकरीला होता. त्यामुळे त्याने भद्रावती येथे जाऊन अनमोल कोल्हटकर यांना सोन्याच्या हाराबाबत माहिती दिली. त्यानंतर दिनेश त्याचा मित्र पारस कुळवे याला घेऊन चंद्रपूरला आला. येथे पोहोचल्यानंतर त्याने सोन्याचा हार विकायचा असल्याचे सांगणाऱ्या इसमाला फोन लावला. त्याने लगेच त्यांना जुनोना चौकात बोलाविले. तेथे एका महिलेसह तिघेजण उपस्थित होते. त्यातील महिलेने दिनेशला सोन्याचा हार दाखवून त्यातील एक सोन्याचा मणी देऊन तो तपासून पाहण्याबाबत सांगितले. सोनाराकडे जाऊन तपासणी केली असता, तो सोन्याचाच असल्याचे सिद्ध झाले. बाजारात त्या सोन्याच्या हाराची किंमत ३० लाख रुपये असली तरी गरजेपोटी आम्ही तो आठ लाख रुपयात देऊ, असे या टोळीतील सदस्यांनी दिनेशला सांगितले. मात्र एवढे पैसे देण्याची दिनेशची ऐपत नसल्याने त्याने ही बाब अनमोल कोल्हटकर यांना सांगितली. मात्र कोल्हटकर यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी चंद्रपूर येथे येऊन घडलेल्या प्रकाराची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांना दिली. ठरल्याप्रमाणे १० मार्चला चंद्रपूरलगतच्या जुनोना परिसरात हा व्यवहार होणार होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचला. बऱ्याच घडामोडीनंतर महाकाली मंदिर परिसरात देवाण-घेवाणीचा व्यवहार करण्याचे ठरले. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक महाकाली मंदिर परिसरात दाखल झाले. तेथील शनी मंदिरामागे टोळीतील महिला स्वत:जवळील नॉयलॉनच्या पिशवीतील नकली हार काढून दिनेशला दाखवीत असतानाच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी आरोपींना अटक केली. या प्रकरणी या टोळीविरुद्ध भादंवि ४२०, ३४, ५११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल उईके, सहाय्यक फौजदार दौलतराव, जमादार गजानन निमकर, संगीडवार, राजकुमार देशपाडे, नायक पोलीस शिपाई अरूण खारकर, पोलीस शिपाई गणेश भोयर, संदीप बुरडकर, विजय वैद्य, महिला पोलीस शिपाई संचिता गावंडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. (प्रतिनिधी)अन् पोलीस निरीक्षक बनले सोनारगुन्ह्याचा तपास करताना अनेकदा पोलिसांना वेशभूषा करून अभिनय करावा लागतो. या घटनेतही तसेच झाले. बनावट सोने विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यासाठी आखलेल्या व्यूहरचनेत पोलीस उपनिरीक्षक सुनील उईके यांनी सोनाराची भूमिका निभावली. पोलीस असल्याचा कुठेही संशय येऊ न देता त्यांनी आपली कामगिरी फत्ते केली.