शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

माजी मालगुजारी तलाव दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम आखा

By admin | Updated: December 13, 2015 00:41 IST

जलसंपदा विभागाकडे असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम आखण्याचे निर्देश अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी..

मुनगंटीवारांचे निर्देश : नागपुरात पार पडली विशेष बैठकचंद्रपूर: जलसंपदा विभागाकडे असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम आखण्याचे निर्देश अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जलसंपदा विभागाला दिले. वनसभागृह नागपूर येथे माजी मालगुजारी तलावाची दुरुस्ती व सिंचन क्षमतेची पुनर्स्थापना करण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवाल, विभागीय आयुक्त अनूप कुमार, उपसचिव टाटू, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आर.एम. चव्हाण, अधिक्षक अभियंता गोसीखुर्द आर.एन. ठाकरे, अधिक्षक अभियंता जे.एम. शेख, अधिक्षक अभियंता आर.के. ढवळे, अभियंता राजेश सोनोने आदी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. चंद्रपूर जिल्हयातील मामा तलावांच्या देखभाल दुरुस्तीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद यापूर्वी करण्यात आली आहे. या कामाचे अचूक नियोजन करण्याच्या सूचना ना. मुनगंटीवार यांनी दिल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील १३२ मामा तलाव जलसंपदा विभागाच्या अखत्यारित असून यासाठी निधीचे नियोजन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम जलसंपदा विभागाने १५ दिवसांत तयार करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक तलावाची निविदा कधी निघणार, काम कधी होणार, याचा तपशिलवार अहवाल तयार करावा असेही त्यानी सांगितले. माजी मालगुजारी तलाव दुरुस्तीचे मापदंड सुधारित करुन देण्यासंबधीचा शासन आदेश लवकरच काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. माजी मालगुजारी तलावात मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यानी केल्या. मत्स्य व्यवसायासाठी तलावातील पाणी राखून ठेवण्यासंबंधी नियोजन करावे. देखभाल दुरुस्ती झाल्यानंतर सिंचन वाढले पाहिजे, असे त्यानी सांगितले. मामा तलावातील गाळ प्राधान्याने काढावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. गोसेखुर्द धरणातील पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील तलावांमध्ये सोडण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. गोसेखुर्द तलावात भरपूर पाणीसाठा असून तो पूर्णपणे उपयोगात न आल्याने जास्तीचा साठा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पाच्या कालव्यात व माजी मालगुजारी तलावात भरुन देण्याची मागणी लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी केली आहे. यावर शनिवारी गोसेखुर्द प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसह ना.सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत विस्तृत चर्चा केली. कशा पध्दतीने पाणी सोडता येईल , त्याचा किती गावांना फायदा होईल, या संबंधीचा गावनिहाय अहवाल सादर करण्याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी दिले. पळसगांव आमडी उपसा सिंचन योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करावे. यासाठी त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. (प्रतिनिधी)