शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

१२ दिवसानंतरही संसार उघड्यावरच

By admin | Updated: June 10, 2014 23:56 IST

कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातील वॉर्ड क्र. ४ मध्ये ३० मे रोजी दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. यात ८६ झोपड्या जळून खाक झाल्यात. घरातील धान्य आणि वस्तुंची राखरांगोळी झाली.

तुटपुंजी मदत : १ कोटी ८० लाखांचे नुकसानरत्नाकर चटप - लखमापूरकोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातील वॉर्ड क्र. ४ मध्ये ३० मे रोजी दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. यात ८६ झोपड्या जळून खाक झाल्यात. घरातील धान्य आणि वस्तुंची राखरांगोळी झाली. आज १२ दिवसानंतरही आगग्रस्तांचे संसार उघड्यावर आहेत. आम्हाला निवारा कधी मिळेल, अशी आर्त हाक ते देत आहेत. शासकीय सर्वेक्षणानुसार या आगीमुळे जवळपास एक कोटी ८० लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले. घरात मुठभर धान्यदेखील उरले नसल्याने हात कुणाकडे पसरावे, असा प्रश्न आगग्रस्तांपुढे उभा ठाकला आहे. सध्या काही सामाजिक संघटना आणि परिसरातील सीमेंट कंपन्या या आगग्रस्तांना मदत करीत आहेत. आगीत सर्वच जळून खाक झाल्याने पुन्हा संसाराचा गाडा कसा उभा करायचा, हा प्रश्न आगग्रस्तांना छळत आहे. या वस्तीत शेतमजूर कामगार व लघुउद्योग करणारे कुटुंब मोठ्या संख्येने वास्तव्याला आहेत. मिळेल ते काम करुन दररोजच्या जेवणाची सोय करणे व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, असा या वस्तीतील लोकांचा दिनक्रम आहे. त्यामुळे राहण्यासाठी घर नसल्याने व प्रशासन इतर मुलभूत सुविधा पुरविण्यात उशिर करीत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे आगग्रस्तांनी सांगितले. काही कुटुंबीयांचे नातेवाईक बाहेरगावावरुन रोजच्या जेवणाचा डबा पुरवित आहेत. परंतु अर्ध्यापेक्षा अधिक रहिवाशांचे नातेवाईक दूर गावी राहतात. त्यामुळे त्यांच्या भोजनाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने सुरुवातीच्या काळात चहा, बिस्कीट आणि भोजनाची व्यवस्था सुरळीतपणे केली. मात्र आता या सामाजिक जबाबदारीतून हात झटकले असल्याचे प्रकर्षाने जाणवते. मिळेल तेव्हा खायचे नाही तर उपाशी रहायचे, अशी परिस्थिती आगग्रस्तांची आहे. आगीतून सावरण्यासाठी जळालेले टिनपत्रे, भांडी, हरविलेल्या वस्तू शोधण्यापलिकडे आगग्रस्तांपुढे पर्याय नाही. आतापर्यंत शासनामार्फत खावटी खर्च म्हणून केवळ बाराशे ते दिड हजार रुपये प्रती कुटुंबाला देण्यात आले आहे. इतक्या कमी पैशात पुन्हा संसार उभा करायचा तरी कसा, असा आगग्रस्तांचा प्रश्न आहे.