शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण ग्रामसमृद्धी व शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रमाचा फज्जा

By admin | Updated: May 23, 2015 01:28 IST

कोरपना तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीमध्ये सन २०१०-२०१४ या कालावधीमध्ये शासनाच्या पर्यावरण ग्रामसमृद्धी व शतकोटी वृक्षारोपण कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा करण्यात आला.

रत्नाकर चटप  नांदाफाटाकोरपना तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीमध्ये सन २०१०-२०१४ या कालावधीमध्ये शासनाच्या पर्यावरण ग्रामसमृद्धी व शतकोटी वृक्षारोपण कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र लाखोचा निधी खर्च होऊन गावात झाडेच लागली नसल्याचे दिसत असल्याने या योजनेचा तालुक्यात फज्जा उडाला आहे.शासनाने सन २०११-१२ मध्ये ग्रामपंचायतींना नर्सरी तयार करण्यासाठी निधी दिला. यातील २० टक्केही रोपे तयार झाली नाही. त्यानंतर रोपवाटिका विकसित करण्यासाठी देण्यात आलेल्या निधीचाही वापर करण्यात आला नसल्याचे चित्र दिसते. सन २०१२-२०१३ मध्ये काही ग्रामपंचायतींनी शकल लढवित बाहेरुन मोजक्या रोपांची खरेदी केली. ही रोपे ग्रामपंचायत कार्यालयातच वाळून गेली तर काही रोपे काही दिवसातच नष्ट झाली आहे. रोपे लावण्यासाठी नियोजन आराखडा व खड्डयाचा आकार याबाबत दुर्लक्ष करण्यात आले. झाडे न लावताच काही ग्रामपंचायतीने कामाचा आराखडा, अंंदाजपत्रक व तांत्रिक मान्यता न घेताच निधी मंजूरर करुन घेतला. यातच गतवर्षी तालुक्यात नरेगा अंतर्गत झाडे लावण्यात आली. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसते. वृक्षारोपणासाठी व संवर्धनासाठी गरज नसताना नऊ रुपयांची प्लॉस्टीक जाळी ५६ रुपयात ग्रामपंचायतीला देण्यात आली. त्याच बरोबर अनेक ग्रामपंचायतीपुढे ट्रक भरुन बांबूही उतरविण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात वृक्षारोपण झालेच नाही. याबाबत काही लोकप्रतिनिधींनी संबंधित विभागाकडे तक्रारी दाखल केल्यानंतर पंचायत समितीने आॅक्टोबर २०१४ मध्ये शतकोटी वृक्षारोपण कार्यक्रमाची तपासणी केली.यात काही ग्रामपंचायतीमध्ये नऊ टक्के, कुठे २८ टक्के, कुठे ३५ टक्के तर कुठे ५ टक्के झाडे जगल्याची दिसले. त्यानंतर १७ एप्रिल २०१५ रोजी मंत्रालयातून चौकशीबाबत पत्रही देण्यात आले. चांदवली मुंबई येथील आमदार नसीम खान यांनी विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित केला. अर्धा तास चर्चाही झाली. प्रश्न १६/१३७ नुसार झाल्यानंतर कोरपना पंचायत समितीमध्ये दोन विस्तार अधिकाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारण्यात आल्याचे समजते. झाड न लावताच खड्डे खोदणे, कचरा काढणे व साफ करणे, पाणी कुंपण यासाठीचा खर्च या योजने अंतर्गत दाखवून अनेक ग्रामपंचायतींनी निधी लाटला आहे. आजमितीला लाखो रुपये खर्च होेऊनही प्रशासन संबंधितांवर कारवाई का करीत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकदा झाड लावल्यानंतर त्याचे मुल्यांकन झाले नसल्याचा प्रकार जिवती व कोरपना तालुक्यात उघडपणे दिसत असताना याबाबत पांघरुन का घातले जात आहे, याबाबत उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये दिसून येत आहे. याकडे संबंधित अधिकारी व विभाग लक्ष देईल का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.