शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींच्या सरकारी पांदण रस्त्यावर अतिक्रमण

By admin | Updated: December 17, 2015 01:12 IST

राजुरा शहरात वाट्टेल त्या शासकीय जमिनी हडपण्याचा प्रकार मागील दशकापासून सुरू असून येथील शासकीय अधिकरी हतबल झालेले दिसत आहे.

राजुरा : राजुरा शहरात वाट्टेल त्या शासकीय जमिनी हडपण्याचा प्रकार मागील दशकापासून सुरू असून येथील शासकीय अधिकरी हतबल झालेले दिसत आहे. राजुरा शहरातील भवानी मंदिरापासून रामपूर ते माथरापर्यंतचा १० मीटरचा पांदण रस्ता आजही सरकारी दस्ताऐवजात आहे. मात्र या करोडोच्या जमिनीवर राजकीय नेत्यांनी व व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. भवानी माता मंदिर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती याला लागूनच १० मीटरचा पांदण रस्ता आहे. या पांदण रस्त्यावरच गोडावून बनवून टाकले आहे. सरकारी जमिनी हडपण्याचा हा गोरखधंदा राजुरा शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असून चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांनीही या अतिक्रमणाकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. या पांदण रस्ताला लागून बळीराम मोहुर्ले यांची जागा होती. ही जागा परावर्तीत आहे. मात्र रस्त्याच्या बाजुला जी जागा आहे ती आणि जागेवरील घरे हे मात्र अकृषक झालेल्याच जागेवर आहे.राजुरा शहरातील तत्कालिन उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार, मुख्याधिकारी हे केवळ राजकीय नेत्यांच्या दबावाखाली काम करताना दिसत आहेत. त्यामुळे ही स्थिती आहे. (शहर प्रतिनिधी)निजामकालीन रेकॉर्ड रुममधून जुने रेकॉर्ड गायबराजुरा शहरातील निजामकालीन रेकार्ड रुम सध्या रामभरोसे आहे. कुणीही या आणि जुना रेकॉर्ड घेऊन जा, असे सुरू आहे. रेकॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर आहे. जुन्या रेकॉर्डमध्ये खोडतोडसुद्धा करण्यात येत आहे. राजुरा तलावाचे ओरिजनल सातबाराचे रेकॉर्ड गायब झाल्याची माहिती आहे. राजुराचा रेकॉर्ड कोरपन्यात, कोरपन्याचा जिवतीत रेकॉर्ड जात आहे. त्यामुळे १९५४ च्या महत्त्वपूर्ण रेकॉर्डचे जतन करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र पाहणीपत्रक, शेतसारा, १९६२ चा सातबारा, वसूल बाकी नक्कल, खसरा पत्रक, १९५४ चा मोडी लिपीचा रेकार्ड असे महत्त्वपूर्ण रेकार्ड रुममध्ये आहे. परंतु या ठिकाणी जबाबदारीने काम होत नसल्याचे चित्र आहे.पांदण रस्त्याचे आॅक्शन व्हावेपांदण रस्त्याचे आॅक्शन करुन शासनाला महसूल मिळवून देता येते. निस्तार हक्क सरकारी पांदण राहते. याचा फक्त नकाशा राहतो. सातबारा राहत नाही. शासकीय जमिनी ज्या अतिक्रमित झाल्या, त्यांच्यावर दंड अकारल्यास करोडोचा महसूल शासनाला प्राप्त होऊ शकतो.